१०वी पास असलेल्यांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, भारतीय पोस्ट खात्यातर्फे महाराष्ट्रात भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
मुंबई : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, भारतीय पोस्ट खात्यातर्फे महाराष्ट्रात भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
१०वी तरुणांसाठी नोकरीची संधी
महाराष्ट्रात २८४ पदांसाठी भरती प्रक्रिया करण्यात येत आहे. या पदासाठी उमेदवार हा केवळ दहावी पास असायला हवा. महाराष्ट्रातील १०वी पास असलेल्या तरुणांसाठी नोकरी मिळविण्याची ही एक सुवर्णसंधीच आहे.
ऑनलाईन पद्धतीने अर्ज
इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी अर्ज दाखल करु शकतात. अर्ज करण्यासाठी इच्छुकांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे लागणार आहेत.
पद:
ग्रामीण डाक सेवक
शैक्षणिक पात्रता:
इच्छुक उमेदवार हा १०वी पास असायला हवा.
वयोमर्यादा:
इच्छुक उमेदवाराचं कमीत कमी वय १८ वर्ष आणि अधिकाधिक ४० वर्ष असावं. उमेदवाराचं वयं १ डिसेंबर २०१७च्या आधारे ठरवण्यात येणार आहे.
परीक्षा फी:
खुल्या प्रवर्गातील आणि इतर मागास वर्गीय उमेदवारांनी १०० रुपये परीक्षा फी द्यावी लागणार आहे. तर, इतर प्रवर्गातील उमेदवारांना परीक्षा फी द्यावी लागणार नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
३० डिसेंबर २०१७
अर्ज करण्याची पद्धत:
इच्छूक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज सादर करायचे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी http://www.appost.in/gdsonline/ या लिंकवर क्लिक करावे.
तर भरतीची संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी http://117.239.178.144/gdsonline/reference.aspx या लिंकवर क्लिक करा.