'मी माझ्या गर्लफ्रेंडला...', विराटचं ऐकून शास्त्रींनी फोन केला अन्...; BCCI ने मोडला नियम! स्वत: सांगितला किस्सा

Ravi Shastri Call For Virat Kohli Girlfriend: विराट कोहलीसंदर्भात बोलताना भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्री यांनी एक मोठा खुलासा केला असून हा खुलासा विराटच्या लग्नापूर्वीचा आहे. नेमकं ते काय म्हणालेत पाहूयात...

| Nov 27, 2024, 13:56 PM IST
1/11

ravishatri

रवी शास्त्री यांनी यापूर्वी कधीही न सांगितलेला एक किस्सा सांगितला असून त्यांनी विराट आणि अनुष्काचा यामध्ये उल्लेख केला आहे. नक्की ते काय म्हणालेत पाहूयात...

2/11

ravishatri

भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्रींनी सोमवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळासंदर्भात म्हणजेच बीसीसीआयसंदर्भात एक मोठा खुलासा केला आहे.   

3/11

ravishatri

बीसीसीआयने अभिनेत्री अनुष्का शर्मासाठी दिर्घकाळापासूनच एका नियम मोडल्याचा दावा रवी शास्त्रींनी केला आहे. या सर्व घटनेचा भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीशी संबंध असल्याचंही रवी शास्त्रींनी सांगितलं आहे.

4/11

ravishatri

भारतीय संघ 2014-16 च्या सिझनमध्ये ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर गेला होता त्यावेळेस अनुष्का शर्मासाठी बीसीसीआयने नियम मोडल्याचं शास्त्री म्हणाले. त्यांनी 'फॉक्स क्रिकेट'शी बोलताना ही माहिती दिली. त्यावेळी 2014-15 च्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला गेला होता. 

5/11

ravishatri

2014-15 च्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी अनपेक्षितपणे विराट कोहलीची कर्णधारपदी वर्णी लागली होती. धोनीने कसोटीमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर करावी लागल्याने कोहली कर्णधार झाला होता. त्याचवेळी तो अनुष्का शर्माला डेट करत होता.

6/11

ravishatri

या दौऱ्याला जाण्यासंदर्भात बोलताना विराट कोहली रवी शास्त्रींकडे गेला होता आणि त्याने ऑस्ट्रेलियामध्ये त्याच्यासोबत त्याची त्यावेळची गर्लफ्रेंड अनुष्का शर्मा सुद्धा येऊ शकते का? यासंदर्भात विचारणा करत तशी परवानगी मागितल्याचं शास्त्रींनी म्हटलं आहे.

7/11

ravishatri

हा किस्सा सांगताना शास्त्रींनी विराटनेच आपल्याला बीसीसीआयच्या नियमांनुसार केवळ खेळाडूंच्या पत्नींनाच त्यांच्यासोबत दौऱ्यावर जाण्याची परवानगी होती. मात्र विराटची विनंती ऐकून शास्त्रींनी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना फोन फिरवला आणि विराटच्या मनाप्रमाणे त्याला परवानगी मिळवून दिल्याचं सांगितलं.

8/11

ravishatri

"मी जेव्हा प्रशिक्षक होतो तेव्हा 2015 मध्ये विराटचं लग्न झालेलं नव्हतं. तो अनुष्काला डेट करत होता. तो माझ्याकडे आला आणि म्हणाला तुम्हाला माहितीये केवळ पत्नीलाच बीसीसीआयकडून खेळाडूबरोबर जाण्याची परवानगी देतात. मात्र मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो का सोबत?" असं रवी शास्त्री म्हणाले.   

9/11

ravishatri

विराटचा हा प्रश्न ऐकल्यानंतर, "त्यावर मी त्याला 'नक्कीच' असं उत्तर दिलेलं. त्यावर त्याने मला बोर्डाच्या नियमाची आठवण करुन दिलेली. मी तेव्हा फोन केला आणि त्यानंतर ती आमच्यासोबत विराटला साथ देत दौऱ्यावर आली होती," असं शास्त्रींनी सांगितलं.   

10/11

ravishatri

अनुष्का ही तेव्हापासूनच विराटची फार मोठी पाठराखीण आहे, असंही शास्त्री सांगायला विसरले नाहीत.   

11/11

ravishatri

अनुष्का आणि विराटने 11 डिसेंबर 2017 लग्न केलं. या दोघांना आता दोन मुलं आहेत. लग्न करण्यापूर्वी हे दोघे मागी अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.