अमित जोशी, झी मीडिया, मुंबई : राज्यात आता सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांशी स्पर्धा करण्यासाठी मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठीही आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या शाळा सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारच्या शिक्षण खात्यानं घेतलाय. यासाठी राज्यात आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या १३ शाळा प्रायोगिक तत्वावर सुरू केल्या जाणार आहेत. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात अशा शाळा सुरू केल्या जातील किंवा काही शाळांना आंतरराष्ट्रीय बोर्ड अभ्यासक्रमात सामावून घेतलं जाणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी दिलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

CBSE, ICSC बोर्डच्या धर्तीवर  राज्य सरकार आता आंतरराष्ट्रीय बोर्ड स्थापन करणार आहे. या निमित्ताने CBSE, ICSC बोर्डाशी टक्कर देणारी शिक्षण व्यवस्था तयार केली जाणार आहे. लवकरच याबाबत घोषणा केली जाणार असल्याचं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केलंय.


एसएससी बोर्डाचा अभ्यासक्रम काहीसा सोपा आहे... तर सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाची काठिण्य पातळी जास्त आहे. त्यामुळे हुशार विद्यार्थ्यांसाठी आतरराष्ट्रीय बोर्ड स्थापन करून दहावीच्या अभ्यासक्रमाची पातळी वाढवली जाणार आहे.