मराठा आरक्षण, ११ वीच्या प्रवेश वेळापत्रकात फेरबदल
११ वीच्या प्रवेश वेळापत्रकात फेरबदल करण्यात आला आहे.
मुंबई : उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब केल्यामुळे ११ वीच्या प्रवेश वेळापत्रकात फेरबदल करण्यात आला आहे. मराठा विद्यार्थ्यांना SEBC प्रवर्गात अर्ज करता येण्यासाठी ४ जुलैपर्यंतची मुदत करण्यात आली आहे. तर पहिली गुणवत्ता यादी १२ जुलैला लागणार आहे. मराठा समाजाला शिक्षणात १२ टक्के आरक्षण देण्यावर मुंबई उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्यानंतर शिक्षण विभागाने अकरावीच्या प्रवेश वेळापत्रकात फेरबदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी याबाबतचे निवेदन विधानसभेत केलं. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना SEBC प्रवर्गात अर्ज करता यावेत यासाठी वेळापत्रकात फेरबदल करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.
त्यानुसार SEBC आणि EWS विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जांमध्ये सुधारणा करण्यात यावी यासाठी ४ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. तर १ जुलैला जाहीर होरी पहिली गुणवत्ता यादी आता १२ जुलैला जाहीर होणार आहे.
अकरावीत SEBC च्या विद्यार्थ्यांसाठी १२ टक्क्यांप्रमाणे ३४ हजार २५१ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. आतापर्यंत या प्रवर्गात केवळ ४ हजार ३५७ अर्ज आले आहेत.