नवी दिल्ली : मोदी सरकार सर्वसामान्यांना पैसे कमवण्यासाठी योजना आणत असेत. सरकारने युवकांसाठी नवीन-नवीन स्पर्धा देखील आणली आहे. आता मोदी सरकार आणखी एका स्पर्धेच्या माध्यमातून युवकांना 25 हजार रुपये कमवण्याची संधी देत आहे. यासाठी खूप मेहनत करण्याची गरज नाही. घरी बसून तुम्ही 25 हजार रुपये कमवू शकता.


कसे कमवाल 25 हजार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोदी सरकारने एक निबंध स्पर्धेचं आयोजन केलं आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांपासून 25 वर्षाच्या युवकापर्यंत स्पर्धक या स्पर्धेत भाग घेऊ शकता. विजेत्याला यासाठी 25 हजारांचं बक्षीस दिलं जाणार आहे.


कोण घेऊ शकतं स्पर्धेत भाग


'अवेयरनेस प्रोग्राम ऑन इंडियन फॉरेन पॉलिसी'च्या थीमवर मोदी सरकारने निबंध स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धकांसाठी दोन श्रेणी आहेत. पहिली ज्यूनियर लेवल ज्यामध्ये 15ते18 वर्षाचे स्पर्धेक असणार आहेत. दूसरं वर्ग सीनियर लेवल, ज्यामध्ये 18 ते 25 वर्षाचे युवक भाग घेऊ शकतात.


निबंधाचे विषय काय


ज्यूनियर गट - 'जलवायु परिवर्तन भारत की विदेश नीती के लिए अहम क्यों है'


सीनियर गट - 'क्या भारत की विदेश नीती हमारे विकास के लिए अहम है'


कुणाला कितीचं बक्षीस


जूनियर लेवलच्या स्पर्धकांना 15 हजार रुपये पहिलं बक्षीस, 10 हजारांचं दुसरं बक्षीस आणि 5 हजारांचं तिसऱं बक्षीस असणार आहे. सीनियर लेवलसाठी पहिलं बक्षीस 25 हजार, दुसरं बक्षीस 15 हजार तर तिसरं बक्षीस 10 हजार रुपये आहे.


31 जुलै शेवटची तारीख


मोदी सरकारच्या या स्पर्धेत भाग घेण्याची 31 जुलै ही शेवटची तारीख आहे. स्पर्धेत भाग घेण्याआधी नियम आणि अटी वाचून घ्या. www.Mygov.in वर जाऊन 'क्रिएटिव कॉर्नर'मध्ये तुम्ही ते पाहू शकता.