मुंबई : महाविद्यालयीन निवडणुकांचा निर्णय जाहीर झालाय. याविषयीचा निर्णय कॅबिनेटमध्ये आधीच घेण्यात आला होता. आता राज्याच्या गॅजेटमध्ये या निर्णयाची घोषणा करण्यात आलीय. 


या निवडणुकांची जबाबदारी विद्यापीठांवर असणार आहे. येत्या वर्षभरात या निवडणुका होणार असून कुलगुरूंसोबत विचारविनिमय करून निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे. मतपत्रिकांच्या माध्यमातून हे मतदान घेतलं जाणार आहे.