NEET UG Cut-Off 2022 : राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET UG 2022) ही कालच्या17 जुलैला झाली आहे. या परीक्षेची उत्तरपत्रिका  (Answer Key) आणि रिझल्टची सर्व विद्यार्थीं आतूरतेने वाट पाहत आहेत. एनटीए द्वारे जाहीर करण्यात येणाऱ्या स्कोरच्या आधारावरच विद्यार्थांना त्यांच्या कॉलेजला अ‍ॅडमिशन घेण्यात येत. मागील काही वर्षांच्या रिझल्ट आणि अ‍ॅडमिशनच्या आधारावर एक्सपर्ट द्वारे नीट यूजीचे कट ऑफची माहिती देण्यात आली आहे. कोणत्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना टॉप कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन घेण्यासाठी किती मार्कस आवश्याक असतील हे सांगण्यात आलं आहे.


ओपन कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी कट ऑफ काय असेल?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


तज्ञांच्या मते, 15% ऑल इंडिया कोटातील (All India Quota) सरकारी महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 650 पेक्षा जास्त गुण मिळवावे लागतात. त्याच वेळी, 85% राज्य कोट्यातील (State Quota) जागांवर 620 पेक्षा जास्त गुण मिळवणारे ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी सरकारी महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकतील.


OBC, SC आणि ST साठी कट ऑफ असाच राहू शकतो



ओबीसी कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी, AIQ जागांसाठी हा स्कोअर 640 आणि राज्य जागांसाठी 600 पर्यंत असू शकतो. दुसरीकडे, अनुसूचित जाती (SC) विद्यार्थ्यांना कौन्सिल प्रक्रियेअंतर्गत सरकारी महाविद्यालयांमध्ये जागा मिळविण्यासाठी AIQ अंतर्गत सुमारे 450 आणि राज्य कोट्यात 385 गुण मिळवावे लागतील. याव्यतिरिक्त अनुसूचित जमाती (ST) विद्यार्थ्यांना AIQ जागांसाठी सुमारे 400 आणि राज्य कोट्यातील जागांसाठी 370 गुण मिळवावे लागतील.


पात्र होण्यासाठी किती गुण आवश्यक आहेत?



ही परीक्षा एकूण 720 गुणांची होती. या परीक्षेत पात्र होण्यासाठी ओपन कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना 50 टक्के गुण आणि आरक्षित कॅटेगरतील विद्यार्थ्यांना 40 टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. गेल्या अनेक वर्षांतील निकाल आणि प्रवेशाच्या आधारे कटऑफबाबत तज्ज्ञांनी हे मत मांडले आहे.