SSC Result 2018 : दहावीचा निकाल या दिवशी लागणार
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालेय परीक्षेचा अर्थात दहावीचा निकाल पुढच्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालेय परीक्षेचा अर्थात दहावीचा निकाल पुढच्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, याच दिवशी निकाल जाहीर होईल, अशी शक्यता नाही. सूत्रांच्या माहीतीनुसार ८ जून किंवा ११ जून २०१८ रोजी निकाल लागण्याची शक्यता आहे. ८ जूनला तारीख घोषीत होण्याची शक्यता आहे. दहावीचा निकाल जाहीर करण्याची पूर्ण तयारी झाल्याची माहिती हाती आलेय. दहावीचा निकाल www.mahresult.nic.in वर जाहीर होईल.
दहावीची परीक्षा १ मार्च ते २४ मार्च दरम्यान झाली. परीक्षेला १८ लाख विद्यार्थी बसले होते. दरम्यान, दहावीचा निकाल ८ जूनला लागण्याची शक्यता आहे. जर या दिवशी निकाल काही कारणाने जाहीर झाला नाही तर ११ जून रोजी निकाल घोषीत होईल. तर दुसरीकडे ४ जून रोजी निकाल घोषीत होईल, असे सांगण्यात आले होते. विद्यार्थी www.examresults.net वर पाहू शकताता.
असा पाहा रिझल्ट
- प्रथम महाराष्ट्र मंडळाच्या ऑफिशियल वेबसाइट www.mahresult.nic.in वर जा.
- आता मुख्यपृष्ठ लिंक एचएससी परीक्षा निकालावर क्लिक करा.
- क्लिक केल्यानंतर उघडणारे वेबपेजवर आपली माहिती टाका. ओके करा.
- क्लिक करून आपण आपला रिजल्ट स्क्रीनवर पाहू शकाल
- येथूनच रिझल्ट डाउनलोड करा आणि प्रिंटआउट काढून सुरक्षित ठेवा.