मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एसएससी म्हणजेच स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत भरती प्रक्रिया चालू केली आहे. ही भरती प्रक्रिया लिपीक संवर्गीय पदांसाठी होत आहे.


इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी अर्ज दाखल करु शकतात. अर्ज करण्यासाठी इच्छुकांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे लागणार आहेत.


पद :


लोअर डिवीजन क्लर्क / ज्युनिअर सेक्रेटरीएट असिस्टंट, पोस्टल असिस्टंट / सॉर्टींग असिस्टंट, डाटा एन्ट्री ऑपरेटर्स


एकूण पद : ३२५९ पदं


लोअर डिवीजन क्लर्क / ज्युनिअर सेक्रेटरीएट असिस्टंट (८९८ पदे)


पोस्टल असिस्टंट / सॉर्टींग असिस्टंट (२३५९ पदे) 


डाटा एन्ट्री ऑपरेटर्स (२ पदे)


शैक्षणिक योग्यता :


इच्छुक आणि पात्र उमेदवार हा मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेतुन बारावी पास असावा.


वयोमर्यादा :


१८ ते २७ वर्षे


अर्ज करण्याची अंतिम तारीख : 


१८ डिसेंबर २०१७


अधिक माहितीसाठी इच्छुकांनी बँकेच्या  http://ssconline.nic.in या अधिकृत वेबसाईटवर अपलोड करण्यात आलेली जाहिरात पहावी.