SSC Result 2018 : कुठे आणि कसा पाहाल तुमचा दहावीचा निकाल
आज दुपारी १.०० वाजता हा निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होतोय. आज दुपारी १.०० वाजता हा निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. १ मार्च ते २४ मार्चपर्यंत दहावीची परीक्षा झाली होती. या परीक्षेला एकूण १७ लाख ५१ हजार ३५३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यात १६ लाख ३७ हजार ७८३ नियमित विद्यार्थी होते. एकूण विद्यार्थ्यांपैकी ९ लाख ७३ हजार १३४ विद्यार्थी आणि ७ लाख ७८ हजार २१९ विद्यार्थिनींनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती...
दहावीचा निकाल कसा आणि कुठं पाहता येईल, ते पाहुयात...
- www.examresults.net
- www.mahresult.nic.in
- www.sscresult.mkcl.org
- www.maharashtraeducation.com
या वेबसाईटवर तुम्हाला निकाल पाहता येईल... तसंच त्यावर निकाल डाऊनलोड करण्याचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात आला आहे. पुढच्या वापरासाठी डाऊनलोड केलेला या निकालाची प्रिंट काढावी लागणार आहे.
'एसएमएस'द्वारे निकाल
तुम्हाला मोबाइल एसएमएस सेवेद्वारेही निकाल पाहता येणार आहे. बीएसएनएल मोबाइल क्रमांकावरून ५७७६६ या क्रमांकावर MHSSC <space> <seatno> लिहून मेसेज पाठवा... त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच निकाल उपलब्ध होईल.
असा पाहा निकाल
- प्रथम महाराष्ट्र मंडळाच्या ऑफिशियल वेबसाइट www.mahresult.nic.in वर जा
- आता मुख्यपृष्ठ लिंक एचएससी परीक्षा निकालावर क्लिक करा
- क्लिक केल्यानंतर उघडणारे वेबपेजवर आपली माहिती टाका. ओके करा
- क्लिक करून आपण आपला रिजल्ट स्क्रीनवर पाहू शकाल
- येथूनच रिझल्ट डाउनलोड करा आणि प्रिंटआउट काढून सुरक्षित ठेवा
निकालानंतर काय...
आज ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच उद्यापासून गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी विद्यार्थ्यांना अर्ज दाखल करता येईल. त्यासाठी आवश्यक अर्जाचा नमुना मंडळाच्या वेबसाईटवर दिला गेलाय. गुणपडताळणीसाठी वेबसाईटवरच्या गुणपत्रिकेच्या स्वसाक्षांकित प्रतीसह शनिवार ९ जून ते सोमवार १८ जूनपर्यंत शुल्क भरून अर्ज करता येणार आहे. छायाप्रतिसाठी शनिवार ९ जून ते गुरुवार २८ जूनपर्यंत शुल्क जमा करून अर्ज करता येईल.