मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावीचा निकाल ९ जूननंतरच जाहीर होण्याची शक्यता असल्याचे मंडळाच्या सूत्रांकडून सांगण्यात आलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

७ मार्चला दहावीची परीक्षा झाली होती. राज्यातील १७ लाख ६६ हजार९८ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. 


गेल्या काही दिवसांपासून निकालाच्या तारखेबाबतचे मेसेज व्हॉट्सअॅप, फेसबुक यासारख्या सोशल मीडियावरुन फिरत होते. त्यामुळे पालक तसेच विद्यार्थ्यी गोंधळलेत. दरम्यान, मंडळाकडून अद्याप निकालाच्या तारखेची कोणतीही घोषणा करण्यात आली नसून निकालाबाबतच्या अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.