नवी दिल्ली : पाचवी ते आठवीच्या परीक्षा पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.  केंद्र सरकार यासंदर्भात संसदेत विधेयक आणणार असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी राज्यसभेत प्रश्न-उत्तराच्या तासात दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातल्या २४ राज्यांनी या परीक्षा घेण्यासंदर्भात अनुकुलता दर्शवली आहे. त्यामुळे विरोधक राज्यसभेत या विधेयकाला समर्थन देतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केलीय. मात्र नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नसल्याचंही त्यांनी नमूद केलंय. 


मार्चमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना मेमध्ये पुन्हा परीक्षा देण्याची संधी देण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.  मात्र सरकारी शाळांमधल्या दर्जाविषयी त्यांनी यावेळी चिंता व्यक्त केली.