मुंबई : परीक्षेत कॉपीचे प्रमाण रोखण्यासाठी शाळा आणि महाविद्यलये अनेक उपाय योजतात. मात्र, एका महाविद्यालयात धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला. चक्क विद्यार्थ्यी डोक्यात पुठ्ठ्याचे खोके घालून परीक्षा पेपर सोडवत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. परीक्षेत विद्यार्थ्यांनी कॉपी करु करु नये म्हणून ही 'सुपीक' डोक्यातील आयड्याची चर्चा जोरदार सुरु आहे. या प्रकारानंतर परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना सुरुवातील काय करायचे ते समजत नव्हते. सगळे एकमेकांकडे बघत हसत होते तर काही जण गोंधळून गेले. आता हे काय नवीन, असं काहींनी तर डोक्यावर हात लावला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्नाटक राज्यात एका महाविद्यालयात हा धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला. चक्क विद्यार्थ्यी डोक्यात पुट्याचे खोके घालून परीक्षा पेपर सोडवत आहेत. याचा फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. हावेरीमधील भगत प्री यूनिव्हर्सिटी महाविद्यालयात कोणीही विद्यार्थी कॉपी करु नये म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांच्या डोक्यात पुठ्ठ्यांचे खोके घालण्यात आले आहेत. केवळ पेपर सोडविण्यासाठी समोरच्या बाजूला खोका कापण्यात आला आहे. दरम्यान, याचा काही विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. 



परीक्षेत पेपर सोडविण्याचे काहींना ओझे वाटते. मात्र, महाविद्याल प्रशासनाच्या या नव्या क्लुप्तीमुळे हे खोके त्रासदायक ठरत आहेत. मात्र, ही एक गंम्मतच सगळ्यांना वाटत आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर या अजब प्रकाराबाबत हसू उमटत आहे. यात शिक्षकही सुटलेले नाहीत. दरम्यान, खोके घालून परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांचा फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्य सरकार जागे झाले. सरकारकडून संबंधित महाविद्यालयाला नोटीस पाठविण्यात आली आहे. या नोटीसला लेखी उत्तर देण्यास बजावण्यात आले आहे.