मुंबई : आर्थिक वर्ष संपत आले की, बऱ्यापैकी पगार असणाऱ्या कर्मचारी वर्गाची एकच धांदल सुरू होते. कारण, अनेक प्रकारचे रींबर्समेंट क्लेम करण्यासाठी त्यांची लगबग असते. पण, गंमत अशी की, वर्षभर या विषयाकडे दुर्लक्ष केलेली ही मंडळी क्लेमसाठी बिलांची जुळवाजुळव करण्याच्या मागे लागते. अनेक महाभाग तर, क्लेम मिळावा यासाठी थेट खोटी (बनावट) बिलेच जोडतात. पण, तुम्हीही हा प्रकार करत असाल तर, सावधान. रिएम्बर्समेंटचे पैसे पदरात पाडून घेण्याच्या नादात तुम्ही जर खोटी बिले जोडू पाहात असाल तर, हे प्रकरण तुमच्या चांगलेच अंगाशी येऊ शकते. कारण, इनकम टॅक्स विभाग या घडामोडींवर बारीक लक्ष ठेऊन आहे.


रिएम्बर्समेंट म्हणजे काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्मचाऱ्यांना पगार रूपाने जी रक्कम मिळते त्यात अनेक प्रकारचे अलाऊन्स आणि रिएम्बर्समेंट दिले जातात. यात ठरावीक मर्यादेपर्यंतची रक्कम फ्री असते. मात्र, ही आर्थिक मर्यादा ओलांडली की, त्याला टॅक्स लागतो. सर्व प्रकारची मेडिकल बिल्स, ट्रान्सपोर्ट अलाऊन्स (टीए), हाऊस रेंट अलाऊन्स (एचआरए), लिव्ह ट्रॅव्हल अलाऊन्स (एलटीए) आदी रीबर्समेंटमध्येच येते. १५ हजार रूपयांच्या मेडिकल बिलांवर इनकम टॅक्समध्ये सवलत मिळते.


खोटी बिले देणारे कसे जाळ्यात अडकतील


 - जर एखाद्याने खोटी बिले जोडली असतील आणि नेमकी त्याचीच फाईल इनकम टॅक्स विभागाने स्क्रूटनीत उचलली तर, दो व्यक्ती गोत्यात येऊ शकतो.
 - स्क्रूटनीत निवडल्या गेलेल्या फाईलमध्ये जी बिले असतील त्याचे पुरावेही त्या व्यक्तिला द्यावे लागू शकतात. त्यामुळे तुम्ही जाळ्यात अडकू शकता.
 -एखाद्या विभागाकडून तुमच्यावर थोडासा जरी संशय आला तरी, तुमच्या फाईलची चौकशी होऊन तुमची पोलखोल होऊ शकते.
 
 दरम्यान, प्रत्येक मोठ्या आर्थिक देवाण घेवाणीवर आयकर विभागाची करडी नजर असते. खास करून १० लाख रूपयांवरील आर्थिक व्यवहारांवर. पॅनकार्डवरूनही तुमचा इनकम आयकर विभागाला कळू शकतो.