नवी दिल्ली : १२ जानेवारी म्हणजे स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस. १२ जानेवारी १८६३ मध्ये कोलकत्ता येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे कार्य लक्षात घेता त्यांची जन्मदिवस युवा दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांचे विचार अत्यंत प्रभावी, सकारात्मक आहेत. तर जाणून घेऊया त्यांचे विचार जे आपले आयुष्य बदलतील....


  • COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    उठा, जागे व्हा आणि कामाला लागा, तोपर्यंत काम करा जोपर्यंत तुम्ही तुमचे ध्येय प्राप्त करत नाहीत.

  • जेवढा मोठा संघर्ष तेवढे यश शानदार असेल.

  • जोपर्यंत जगू तोपर्यंत शिका, अनुभवच जगातील सर्वश्रेष्ठ शिक्षक आहे. 

  • ज्ञान हे वर्तमान आहे, मनुष्य केवळ त्याचा अविष्कार आहे.

  • पवित्रता, धैर्य आणि उद्योग हे तीन गुण एकत्र असायला हवेत.

  • ध्यान आणि ज्ञानाचे प्रतिक भगवान शिव आहे. पुढे जाण्यास शिका.

  • अभ्यासासाठी आवश्यक आहे एकाग्रता, एकाग्रतेसाठी गरजेचे आहे ध्यान, ध्यानातूनच आपण इंद्रियांवर संयम ठेऊ शकतो आणि एकाग्रता प्राप्त करू शकतो.

  • लोक तुमची स्तुती करोत किंवा नाहीत. तुम्ही मात्र न्यायाचा मार्ग सोडू नका.

  • जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास करणार नाही तुम्ही देवावर विश्वास करू शकणार नाही. 

  • एकावेळी एक काम करा आणि बाकी सर्व विसरून पूर्ण आत्माने त्या कामात सर्मपित व्हाल.