मुंबई : सिंडिकेट बँकेत भरती होण्याची मोठी संधी... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

500 लोकांसाठी ही भरती असून इच्छुक असणाऱ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. ही ऑनलाईन प्रक्रिया नवीन वर्षापासून म्हणजे 1 जानेवारीपासून सुरू होणार आहे. फॉर्म भरण्याची अंतिम तारीख ही 17 जानेवारी असणार आहे. कोणत्या पदांसाठी ही भरती आहे जाणून घ्या.... 


इथून भरा ऑनलाईन फॉर्म - 


खाली दिलेल्या संकेतस्थळावर syndicatebank.in वर क्लिक करून इच्छुक असणाऱ्यांनी फॉर्म भरावा. फॉर्म भरण्यासाठी डायरेक्ट या संकेतस्थळावर जाऊ शकता. 


एवढी योग्यता आवश्यक 


या पदासाठी ग्रॅज्युएशन कॅंडिडेट असण आवश्यक आहे. तसेच शेवटच्या वर्षाला 60 टक्के असणे आवश्यक आहे. एससी, एसटी, पीडब्ल्यूडी वर्गाच्या उमेदवारांनी 55 टक्के गुण असणे आवश्यक आहे. त्यामुळे ही पात्रता असलेल्या व्यक्ती याचा लाभ घेऊ शकतात. 


वयाची मर्यादा 


यासाठी वय मर्यादा ही 20 ते 28 वर्षे असणे आवश्यक आहे. या वयात बसणारे उमेदवार यासाठी पात्र आहेत. 


अशी असणार पद्धत 


बँक उमेदवारांच लेखी परिक्षा होणार असून इंटरव्ह्यू देखील होणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी दोन्हीसाठी तयार राहावे. दोन्हीची तयारी चांगली करावी. 


परीक्षा फी एवढी भरावी लागणार 


सामान्य वर्ग आणि ओबीसीच्या उमेदवारांना 600 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. तसेच एससी आणि एसटी वर्गातील उमेदवारांना 100 रुपयाचे शुल्क आकारले जाणार आहेत. त्यामुळे याची साऱ्यांनी नोंद घ्यावी 


फॉर्म भरण्यास या तारखेपासून सुरूवात 


1 जानेवारी 2018 या तारखेपासून फॉर्म भरण्यास सुरूवात होणार आहे. तर सगळ्यांनी याची नोंद घ्यावी


फॉर्म भरण्याची अंतिम तारिख 


17 जानेवारी 2018 ही फॉर्म भरण्याची अंतिम तारीख आहे. या तारखेच्या अगोदर फॉर्म भरावा. 


परिक्षेचा संभावित तारीख 


18 फेब्रुवारी 2018 या तारखेला अंदाजे परिक्षा होण्याची शक्यता आहे.