मुंबई  : विद्यापीठाने निकालांसाठी जाहीर केलेली नवी डेडलाईनही हुकणार आहे. कारण ३१ ऑगस्टपर्यंत कॉमर्सचे पेपर तपासून पूर्ण होणार नाहीत, असं स्पष्टीकरण विद्यापीठाने दिले आहे. दरम्यान, अद्याप ६९ निकाल जाहीर करण्याचे आव्हान आता विद्यापीठासमोर आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॉमर्स वगळता इतर विषयांचे निकाल जाहीर करण्यासाठी ३१ ऑगस्ट ही नवी डेडलाईन विद्यापीठाने जाहीर केलीय. पण कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना मात्र आणखी वाट पाहावी लागणार आहे. 


ऑनलाईन पेपर तपासणीने होणाऱ्या विलंबाने विद्यार्थ्यांचं अख्ख वर्ष वाया जाण्याची वेळ आलीय. आतापर्यंत ४०८ शाखांचे निकाल जाहीर झाले. आज १४ विभागांचे निकाल जाहीर झाले आहेत.