'या' शहरात होणार आयपीएलचं मेगा ऑक्शन; तुम्ही कधी येथे गेलात का? फिरण्यासाठी येतो फक्त इतका खर्च

जगातील सर्वात मोठ्या टी 20 लीगपैकी एक असणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनसाठी लवकरच मेगा ऑक्शन पार पडणार आहे. आयपीएलचं  ऑक्शन सलग दुसऱ्यांदा भारताबाहेर होणार असून यासाठी जवळपास एकी महिन्यांपासून तयारी सुरु होती. यंदाचं मेगा ऑक्शन अतिशय भव्यदिव्य असणार असून 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी आयपीएलमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंचं भवितव्य ठरणार आहे. तेव्हा मेगा ऑक्शन होणार शहर फिरण्यासाठी नेमका किती खर्च येतो याविषयी जाणून घेऊयात.

| Nov 18, 2024, 19:09 PM IST
1/7

आयपीएल 2025 चं मेगा ऑक्शन 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. यंदा सौदी अरेबियातील जेद्दाह या शहरात ऑक्शन होणार आहे. रविवारी  दुपारी 12 : 30 च्या दरम्यान या ऑक्शनला सुरुवात होणार असून आयपीएलच्या सर्व 10 फ्रेंचायझींची टीम येथे उपस्थित असेल.    

2/7

जेद्दाह हे सौदी अरेबियातील एक प्रमुख शहरांपैकी एक असून हे सर्वात मोठे शहर सुद्धा आहे. जेद्दाह हे शहर इस्लामची सर्वात पवित्र नगरी 'मक्का' येथील मुख्य प्रवेश द्वार सुद्धा आहे.  लाल समुद्राच्या किनाऱ्यावर असलेल्या सर्व बंदरांपैकी हे सर्वात मोठे बंदर आहे. ही सौदी अरेबियाची दुसरी व्यापारी राजधानी मानली जाते.  

3/7

जेद्दाह या शहरात पाहण्यासाठी अनेक ऐतिहासिक ठिकाण तसेच प्रेक्षणीय स्थळ आहेत. येथे अल बलाद, रेड सी मॉल, किंग फाहद फाउंटन, अल रहमा मशीद, मॉल ऑफ अरेबिया, फकीह मत्स्यालय, अल तयबत आंतरराष्ट्रीय शहर, सिल्व्हर सॅण्ड बीच, नसिफ हाऊस म्युझियम इत्यादी ठिकाणं प्रेक्षकांची आकर्षण आहेत.   

4/7

जेद्दाह हे शहर फिरण्यासाठी विविध कंपन्या आकर्षक टूर पॅकेज देत आहेत. भारतातील टूर कंपन्या ३ दिवस जेद्दाह हे शहर फिरण्यासाठी जवळपास 50 हजार प्रति व्यक्ती रुपये आकारतात. 

5/7

टूर कंपन्या 3 दिवस जेद्दाह हे शहर फिरण्यासाठी जवळपास ५० हजार प्रति व्यक्ती रुपये आकारतात. ज्यात हॉटेल स्टे आणि तेथे फिरण्याच्या खर्चाचा समावेश असतो. तर विमान प्रवासाचा खर्च वेगळा आहे.   

6/7

24 आणि 25 नोव्हेंबर रोजी आयपीएल 2025 चं मेगा ऑक्शन क्रिकेट चाहत्यांना जिओ सिनेमावर लाईव्ह पाहता येणार आहे. या ऑस्कनसाठी देश विदेशातील एकूण 1574 खेळाडूंनी नोंदणी केली. नोंदणी केलेल्या 1574 खेळाडूंमध्ये 320 कॅप खेळाडू, 1224 अनकॅप खेळाडू आणि असोसिएट नेशन्समधील 30 खेळाडूंचा समावेश आहे. 1574 खेळाडूंनी नोंदणी केली असली तरी प्रत्यक्ष आयपीएलसाठी एकूण 204 स्लॉट्स आहेत. 

7/7

आयपीएलमध्ये प्रत्येक संघाकडे एकूण 120 कोटी असतात. यापैकी काही पैसे हे खेळाडूंना रिटेन करण्यासाठी खर्च केले जातात आणि इतर रक्कम ही मेगा ऑक्शनमध्ये खेळाडूंना विकत घेण्यासाठी वापरली जाते.  पंजाब किंग्स - 110.5 कोटी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - 83 कोटी रुपये, दिल्ली कॅपिटल्स - 73 कोटी, गुजरात टायटन्स - 69 कोटी, लखनऊ सुपर जायंट्स - 69 कोटी, चेन्नई सुपर किंग्स - 55 कोटी, मुंबई इंडियन्स - 45 कोटी, कोलकाता नाइट राइडर्स - 51 कोटी, सनराइजर्स हैदराबाद - 45 कोटी, राजस्थान रॉयल्स - 41 कोटी.