नवी दिल्ली : कोणतंच काम दिसतं तितकं साधं सोपं नसतं. त्यामागे अभ्यास, मेहनत, परिश्रम असतात. तसंच आपण ते काम किती प्रामाणिकपणे करतो हे देखील महत्त्वाचे असते. दिल्लीहून हॉन्ग कॉन्गला जाणाऱ्या एका फ्लाईटच्या एअरहॉस्टेसजवळ डॉलर्सचे बंडल्स सापडले. थोडेथोडके नव्हे तर ८० हजार डॉलर्स म्हणजे ३ कोटी २१ लाखांची रक्कम सापडली आहे. जेट एअरवेजच्या या एअरहॉस्टेसने कबूल केले की, हे पैसे बाहेर पाठवले जायचे त्यापैकी अर्धी रक्कम तिला मिळत होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असे काही कर्मचारी असले तरी मुलाखतीच्या वेळी एअरहॉस्टेसला काय प्रश्न विचारले जातात, जाणून घेऊया...


१. जर एखाद्या प्रवाशाने सांगितले की, या अस्थि कलशात माझ्या नातेवाईकाच्या किंवा कोणाच्याही अस्थि आहेत आणि तो कलश तो प्रवासी सीटखाली ठेवण्यास तयार नसल्यास तुम्ही काय कराल


२. एखाद्या आंधळ्या प्रवाशाला पिवळा रंग कसा सांगशील


३. फ्लाईट सुरू असताना तुम्ही ऑथराइज नसलेले एखादे काम पायलटने तुम्हाला सांगितले तर अशावेळी तुम्ही काय कराल


४. एखादी इमरजेन्सी सिच्युएशन सांगा आणि ती तुम्ही कशी हाताळाला ते सांगा.


५. अंडर प्रेशर देखील तुम्ही काम करू शकता, हा विश्वास आम्हाला मिळवून द्या.


६. इंटरनेशनल डिस्ट्रेस सिग्नल काय असतात.


७. एखाद्या प्रवाशाने टेक ऑफच्या वेळेस लॅपटॉप बंद न केल्यास तुम्ही काय कराल तुम्ही सांगितल्यावर देखील त्यांनी लॅपटॉप बंद न केल्यास काय कराल


८. टेक ऑफच्या वेळेस एखादा प्रवासी मेसेज पाठवत असेल तर काय कराल


९. कपल फ्लाईटमध्ये ५० वा लग्नाचा वाढदिवस साजरा करत असेल, तर त्यासाठी अनाऊंसमेंट करून दाखवा.


१०. फ्लाईटमध्ये एक सीट बाकी असताना त्या सीटसाठी ५ जण वाट बघत आहेत. पहिला युनिफॉर्म घातलेला आर्मी ऑफिसर,  दुसरा इन्फेंटसोबत महिला, तिसरी व्यक्ती एअरलाईन्सची जुनी कस्टमर आहे, चौथी गर्भवती महिला आणि पाचव्या व्यक्तीला आपल्या आजारी बहिणीला भेटायला जायचे आहे, तर ती सीट तुम्ही कोणाला द्याल.