मुंबई : उन्हाळा खूप वाढला आहे. त्यामुळे साहजिकच पंखा, एसीचा, कूलरचा वापर वाढेल. याचा सगळ्याचा परिणाम दिसेल तो म्हणजे विजेच्या बिलावर. आणि विजेचे बिल जास्त आले तर स्वाभाविकच आपल्यावरही थोडा ताण येतो. पण आता काळजी करु नका. या सोप्या टिप्सने तुमचे विजेचे बिल कमी करण्यास मदत करतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१. फ्रिज रिकामा असेल तर खूप वीज खर्च होते. त्यामुळे फ्रिजमध्ये नेहमी फळे, भाज्या ठेवा आणि फ्रिज नेहमी नॉर्मल मोडवर ठेवा.


२. अनेकदा आपण वॉशिंग मशिनमध्ये खूप कपडे टाकतो. पण जर कपडे वॉशिंग मशिनच्या क्षमतेपेक्षा जास्त असतील तर तुमचे विजेचे बील जास्त येणारच. त्यामुळे क्षमेतेनुसारच वॉशिंग मशिनमध्ये कपडे टाका.


३. अनेक लोक झोपण्यापूर्वी घरातली लाईट्स ऑन ठेवतात. त्यामुळे विनाकारक बिल वाढते. त्यामुळे गरज नसेल तेव्हा लाईट्स बंद करा. 


४. घरातील बल्पमुळे विजेच्या बिलात भर पडते. त्यामुळे त्याऐवजी सीएफएलचा वापर करा त्यामुळे वीजबिल नक्कीच कमी होईल. झिरो वॉल्टचा बल्पही सुमारे दहा वॉल्टची वीज खर्च होते. त्यामुळे कंप्म्युटर, टी.व्ही. चे पावर बटन गरज नसेल तेव्हा बंद करा.


५. कंप्म्युटर, टी.व्ही., प्लेअर रात्रीच्या वेळेस चालू ठेवल्यास वीजेचे बिल वाढेल. घरातील उपकरणे पॉवर एक्सटेंशनला जोडून घ्या. कारण विजेचा लोड एकदम वाढल्यास उपकरण जळण्याचा धोका कमी होतो.


६. तुमच्याकडे वॉटर हिटर असल्यास नेहमी ४८ डिग्रीवर ठेवा. त्यामुळे वीज कमी खर्च होईल.


७. उन्हाळ्यात एसीचा वापर वाढल्याने बाहेरील वातावरण खूप खराब होते. त्याचबरोबर तुमच्या आरोग्यासाठीही एसीची हवा योग्य नाही. कूलर असल्यास तु्म्हाला हे दोन्ही त्रास टाळता येतील. त्यामुळे गरज असल्यास एसीचा वापर करा अन्यथा कूलर हा उत्तम पर्याय आहे.


८. सोलार पॅनल खूप स्वस्त झाले आहेत. त्यामुळे त्याचा वापर करावा. विजेच्या बिलात नक्कीच फरक दिसून येईल.


९. खिडकीतून खूप ऊन आत येते. त्यामुळे घरातील तापमान वाढते. मग एसी, कूलर, पंखाच्या वापर वाढतो. परिणामी विज बिलात भर पडते. म्हणून शक्य असल्यास खिडक्या बंद ठेवा.


१०. कपडे मशीनऐवजी उन्हात सुकवा. त्यामुळे वीज बील खूप वाचेल.