मुंबई : भारतात फिरण्यासाठी जागांची कमी नाही. फक्त गरज आहे प्लॅन करण्याची. आपला देश इतका मोठा आहे की नक्की कुठे फिरावे या संभ्रमात तुम्ही असाल. आणि त्याचबरोबर बजेटही सांभाळावे लागते. तर ही आहेत भारतातील स्वस्त आणि मस्त अशी खास ५ ठिकाणं.


कसोल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिमाचल प्रदेशातील हिल स्टेशनमध्ये कसोल नावाची अत्यंत प्रसिद्ध जागा आहे. तिथेल पार्वती नदीमुळे या जागेच्या सौंदर्यात भर पडली आहे. कसोल हे कुल्लू वरु सुमारे ४२ किलोमीटर दूर आहे. १६४० किलोमीटर उंचीवर वसलेले हे ठिकाण निसर्गसौंदर्याने नटलेले आहे. 


मसुरी


अत्यंत सुंदर शहर म्हणून मसुरीची ओळख आहे. मसुरी पर्वतांना राणीच्या नावाने ही ओळखले जाते. डेहराडूनपासून सुमारे ३५ किलोमीटर अंतरावर हे शहर आहे. पर्यटनासाठी उत्तराखंडातील प्रमुख ठिकाणांपैकी हे एक आहे. 


गोवा


कमी पैशात पुष्कळ धम्माल करायची असेल तर गोवा अत्यंत बेस्ट ठिकाण आहे. पर्यटनासाठी गौवा जगात प्रसिद्ध आहे. नारळाच्या बागा, समुद्रकिनारे आणि मासे खाण्याची मज्जा घ्यायची तर गोव्यातच.


जयपूर


पिंक सीटी म्हणजेच गुलाबी शहर अशी या शहराची ओळख. येथील पॅलेस पाहण्यासारखे आहेत. पण हे फिरण्याचा योग्य वेळ म्हणजे हिवाळा.


उटी


निलगिरीच्या सुंदर पहाडांमध्ये वसलेले सुंदर शहर म्हणजे उटी. दक्षिणेतील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असे म्हणायला हरकत नाही. तेथील पहाडांना ब्लू माऊंटन देखील बोलले जाते.