मुंबई : कोणत्याही कंपनीत नोकरी मिळवण्यासाठी तुम्ही सर्वात आधी काय करता? अगदी सोपे आहे. पहिल्यांदा तुमचा रिज्यूमे पाठवता. पण अमेरिकेत एक अशी कंपनी आहे जिथे काम करण्यासाठी तुम्हाला रिज्यूमे पाठवण्याची गरज नाही तर लव्ह लेटर पाठवण्याची आवश्यकता आहे.


कोणती आहे ती कंपनी?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही गंमत नाही तर अगदी खरे आहे. अमेरिकेत अॅक्विटी शेड्यूलिंग नावाची कंपनी आहे. जी उमेदवारांकडे रिज्यूमे नाही तर लव्ह लेटर मागते. या कंपनीत अप्लाय करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला लव्ह लेटर लिहावे लागेल.
कंपनीचे सीईओ गेविन जुचलिंस्कीनुसार, जॉब करणे हे डेटिंग करण्यासारखेच आहे. ऑनलाइन शेड्यूलिंग कंपनीची भरती प्रक्रिया अनोखी आहे. वर्तमानपत्रात नोकरीची जाहिरात देतो तेव्हा कोणाला तरी डेटवर बोलवण्यासारखे असते. त्यामुळे आम्ही लव्ह लेटरची मागणी करतो. त्यानंतर कंपनी उमेदवारांकडून आलेले लव्ह लेटर्स वाचते आणि त्या आधारावर कंपनीसाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाते. याच आधारावर त्यांना पुढच्या राऊंडसाठी बोलवले जाते.


लव्ह लेटर मागवण्यामागे हा आहे उद्देश


कंपनीचे सीईओ गेविन जुचलिंस्की यांनी पुढे सांगितले की, उमेदवाराच्या मनातील विचार जाणून घेणे, हा लव्ह लेटर लिहायला सांगण्यामागचा उद्देश असतो. ती व्यक्ती कसा विचार करते, त्याची विचारधारा काय आहे, हे जाणून घेता येते. आणि हे सर्व त्या लव्ह लेटरवरुन समजते.


मग रिज्यूमे कधी?


रिज्यूमेबद्दल सीईओ म्हणतात की, आम्ही उमेदवाराचा रिज्यूमे देखील मागतो पण अगदी शेवटच्या राऊंडला. त्याचबरोबर कंपनी वर्क ऑफ होम म्हणजेच घरातून काम करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देते. उमेदवाराला फक्त ६ तास काम करायचे आहे.