बँक स्पेशालिस्ट ऑफिसर पदांसाठी भरती
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (आयबीपीएस) ने वेगवेगळ्या बँकामध्ये स्पेशालिस्ट ऑफिसरसाठी भरती केली जाणार आहे. एकूण १३१५ पदांवर नियुक्ती केली जाणार आहे.
मुंबई : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (आयबीपीएस) ने वेगवेगळ्या बँकामध्ये स्पेशालिस्ट ऑफिसरसाठी भरती केली जाणार आहे. एकूण १३१५ पदांवर नियुक्ती केली जाणार आहे.
स्पेशालिस्ट ऑफिसर पदासाठी २० विविध बँकामध्ये भरती केली जाणार आहे. ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया ७ नोव्हेंबरपासून सुरु केली जाणार आहे. २७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवार अर्ज करु शकतात. उमेदवारांची निवड ऑनलाईन टेस्ट आणि मुलाखतीद्वारे केली जाईल.
यासाठी वयोमार्यादा २० ते ३० वर्षांपर्यंत असणे गरजेचे आहे. एससी, एसटी वर्गांसाठी ही वयोमर्यादा पाच वर्षांसाठी शिथिल करण्यात आलीये. तर ओबीसी वर्गातील उमेदवारांसाठी तीन आणि दिव्यांगांसाठी १० वर्षांसाठी शिथिल करण्यात आलीये.
अर्ज करताना सामान्य आणि ओबीसी वर्गासाठी शुल्क ६०० रुपये आहे. तर एससी, एसटी आणि दिव्यांगांसाठी हे शुल्क १०० रुपये आहे. हे शुल्क तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, आयएमपीएस, कॅश कार्ड आणि मोबाईल वॉलेटच्या माध्यमातून करु शकता.