मुंबई : पदवीधर झालात की लगेच नोकरी मिळण्याचे दिवस आता गेलेत. शिक्षण हा केवळ एक टप्पा आहे. त्यानंतरही तुम्हांला सतत अपडेट रहावे लागते. अनेक कोर्स करावे लागतात. मग एखादी नोकरीची संधी उपलब्ध होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इलेक्ट्रोनिक्समध्ये पदवी मिळवलेल्यांना सध्या नोकरीची एक सुवर्णसंधी खुली झाली आहे. 


कुठे आहे संधी ? 


इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये वेकेन्सी खुली झाली आहे. ग्रॅज्युएट ट्रेनी म्हनोऔन ही संधी उपलब्ध झाली आहे. 


पात्रता  


इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये ६६ उमेदावारांना ही संधी मिळणार आहे.  त्यासाठी संबंधित ट्रेडमध्ये किमान ६५ % गुण मिळणं आवश्यक आहेत. सोबतच इंजिनियरिंगची पदवी मिळालेलेच उमेदवार हे पात्र ठरणार आहेत. 


अंतिम तारीख 


उमेदवार २२ डिसेंबर पर्यंत या पदासाठी अ‍ॅप्लिकेशन करू शकणार आहेत.  


वयोमर्यादा  


१८-२५ वयोगटातील उमेदवार अ‍ॅप्लिकेशन करू शकणार आहेत.  यासाठी ५०० रूपयांची फी आकारण्यात येणार आहे. 


कशी होणार निवड  ? 


या पदाच्या निवडीसाठी एक परीक्षा घेतली जाईल. कम्प्युटर बेस्ड परीक्षा घेतली जाईल.  


कुठे कराल अर्ज 


www.ecil.co.in या वेबसाईटवर ऑनलाईनच्या माध्यमातून तुम्ही अर्ज करू शकाल.