शशी कपूर यांच्याबद्दल १० रोचक गोष्टी
अभिनेते शशी कपूर यांचे मुंबईत ७९ व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शशी कपूर आजारी होते आणि रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते.
मुंबई : अभिनेते शशी कपूर यांचे मुंबईत ७९ व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शशी कपूर आजारी होते आणि रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते.
शशी कपूर यांच्याबद्दल १० गोष्टी
1) 18 मार्च 1938 ला कोलकाता येथे शशी कपूर यांचा जन्म झाला. त्यांचं खरं नाव बलबीर राज कपूर होतं. त्यांना प्रेमाने शशी असं म्हटलं जायचं. त्यावरुनच त्यांचं नाव शशी कपूर पडलं.
2) शशी कपूर हे भाऊंमध्ये सर्वात लहान आहेत. त्यामुळे त्यांना शशी बाबा देखील म्हणायचे. मोठा भाऊ शम्मी कपूर त्यांना शाशा बोलायचे.
3) वडील आणि भाऊ यांना पाहून शशी कपूर यांनी देखील सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. वडील पृथ्वीराज कपूर यांनी शशी कपूर यांना स्वत: आपल्या पायावर उभं करण्यासाठी सांगितलं.
4) बाल कलाकारच्या रुपात शशी यांनी आग (1948), आवारा (1951) यासारख्या सिनेमांमध्ये काम केलं.
5) 1961 मध्ये धर्मपुत या सिनेमातून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली.
6) शशी कपूर यांनी जेव्हा अभिनेता म्हणून करिअरला सुरुवात केली. तेव्हा त्यांचे भाऊ राज कपूर आणि शम्मी कपूर हे त्यांच्या करिअरच्या शीर्ष स्थानी होते. फिल्म निर्मात्यांची तिसरी पसंत शशी कपूर असायचे. सुरवातीला त्यांना दुय्यम दर्जाचे अभिनय देखील करावे लागले.
7) सर्व भाऊंमध्ये शशी कपूर हे सर्वात हँडसम मानले जायचे. त्यावेळेस अनेक तरुणी त्यांच्या चाहत्या होत्या.
8) शशी कपूर यांना मोठं यश 'जब जब फूल खिले' (1965) या सिनेमातून मिळालं. मधुर संगीत, रोमांटिक कहानी आणि शशी कपूर-नंदा यांच्या जोडीने लोकांचं मन जिंकलं.
9) जब जब फूल खिले सिनेमामध्ये भूमिका साकारण्यासाठी शशी कपूर यांनी काही दिवस काश्मीरमधील नाविकांसोबत वेळ घालवला. कारण त्यांना त्यांची भूमिका साकारायची होती. त्यांच्यासोबत त्यांनी जेवण सुद्धा केलं.
10) शशी कपूर यांची नंदा ही सर्वात आवडती अभिनेत्री होती.