sushant singh rajput : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (sushant singh rajput) याने 14 जून 2020 रोजी मुंबई मधील वांद्रे येथील राहत्या घरी आत्महत्या करत स्वतःचा जीवन प्रवास संपवला. अभिनेत्याने गळफास घेत आत्महत्या केली. सुशांतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील अनेक रहस्य समोर आले. पण अभिनेत्याने आत्महत्या का केली? यामागील सत्य अद्याप समोर आलेलं नाही. सुशांतच्या आत्महत्येला जवळपास दोन वर्ष उलटली आहेत. पण आजही अभिनेत्याच्या चर्चा चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. सुशांत आज आपल्यात नसला तरी, त्याचे काही चित्रपट नेहमीच प्रेक्षकांच्या स्मरणात राहतील.  त्याचे काही चित्रपट नेहमीच प्रेक्षकांच्या स्मरणात राहतील.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुशांतसिंह राजपूतने (sushant singh rajput) टेलिव्हिजनमधील त्याच्या कारकिर्दीची सुरुवात सहाय्यक भूमिकेने केली होती. सुशांतने 'पवित्र रिश्ता' या लोकप्रिय मालिकेत मुख्य भूमिका साकारत प्रकाश झोतात आला. 'जरा नच के देखा' आणि 'झलक दिखला जा' यासारख्या अनेक रिअॅलिटी शोमध्ये आपली झलक दाखवत स्थान निर्माण केले. त्यानंतर अभिषेक कपूर दिग्दर्शित 'काई पो चे' हा सुशांतचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटात सुशांतने एका अपयशी क्रिकेटरच्या प्रशिक्षकाची भूमिका साकारली होती. त्याने आपल्या अप्रतिम भूमिकेने चाहत्यांची मन जिंकले. 


वाचा: Taarak Mehta दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार, 'या' अभिनेत्रीसोबत झाला होता पहिला घटस्फोट 


 या चित्रपटाला आज, म्हणजे 22 फेब्रुवारीला तब्बल 10 वर्षे पूर्ण झाली. याचपार्श्वभूमीवर दिग्दर्शक अभिषेक कपूरने सोशल मीडियावर एक पत्र लिहले असून चित्रपटाशी संबंधित कलाकारांनी आठवण काढली आहे. काय पो चे हा हिंदी चित्रपटसृष्टीतील यशस्वी आणि प्रसिद्ध चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाने सुशांतच्या करिअरला टीव्हीपासून मोठ्या पडद्यावर चांगली सुरुवात झाली होती.   चित्रपटात सुशांत व्यतिरिक्त राजकुमार राव आणि अमित साध हे देखील मुख्य स्टारकास्टचा भाग होते.