एका नर्स आणि 1000 मुलं...सिनेमाची `ही` कथा तुम्हाला हादरवून सोडेल, हिंमत असेल तरच बघा
2024 Best Crime Thriller Miniseries: या वेब सीरिजला IMDb वर उत्तम रेटिंग आहे आणि सध्या ही सिरीज OTT वर टॉप 10 मध्ये ट्रेंड करत आहे. या सिरीजमध्ये तुम्हाला भयपटाशी संबंधित एक हत्येची रहस्यकथा पाहायला मिळणार आहे.
1000 Babies: जेव्हापासून OTT हे माध्यम सुरु झाले तेव्हापासूनच अनेक वेगवगेळ्या धाटणीच्या कथा प्रेक्षकांना बघायला मिळत आहेत. यामुले प्रेक्षकांनाच्याही आवडी-निवडींमध्ये बरेच बदल झाले आहेत. प्रत्येकाला वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट आणि वेब सिरीज बघायला आवडतात. काहींना ॲक्शन, काहींना थ्रिलर, तर काहींना हॉरर आवडतात. आज आम्ही तुम्हाला अशा एका मिनी वेब सीरीजबद्दल सांगणार आहोत, जी या वर्षी रिलीज झाली आणि ती येताच तिला अफाट लोकप्रिय मिळाली आहे. ही एक मर्डर मिस्ट्री सस्पेन्स थ्रिलर मालिका आहे ज्यामध्ये एक भयपट घटक आहे. कथेत असे अनेक ट्विस्ट आहेत जे तुम्हाला आश्चर्यचकित करतील आणि कदाचित घाबरतील.
कधी रिलीज झाली वेब सिरीज?
या मिनी वेब सिरीजच नाव आहे '1000 बेबीज'. ही सिरीज यावर्षी 18 ऑक्टोबर रोजी OTT वर रिलीज झाली होती. या सिरीजचे दिग्दर्शन नाझिम कोया यांनी केले असून कथा नाझिम कोया यांनी अरुज इरफानसोबत याची कथा लिहिली आहे. या सिरीजमध्ये नीना गुप्ता, संजू शिवराम, जॉय मॅथ्यू आणि रेहमान सारखे कलाकार दिसत आहेत. ही सिरीज OTT वर टॉप 10 मध्ये ट्रेंड करत आहे.
नीना गुप्ता यांची उत्तम भूमिका
या वेब सिरीजमधील नीना गुप्ताच्या व्यक्तिरेखेने सर्वांनाच चकित केले. तिने तिची आपली व्यक्तिरेखा इतकी छान साकारली आहे की तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. नीना गुप्ता या सिरीजमध्ये सारा ओसेफच्या भूमिकेत दिसत आहे. या मालिकेतील तिच्या लूक आणि अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. नीना गुप्ता नेहमीच तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. ती प्रत्येक प्रकारच्या भूमिकेत बसते आणि ती जिवंत करते. हे या मालिकेतही पाहायला मिळेल.
सिरीजची कथा तुम्हाला हादरवून सोडेल
या मिनी वेब सिरीजची कथा सारा ओसेफ नावाच्या एका नर्सभोवती फिरते. जिने तिच्या भूतकाळात 1000 मुलांसोबत असे काही केले आहे, ज्यामुळे तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. ती तिच्या मुलाला याबद्दल सांगते, ज्यामुळे तो तिचा तिरस्कार करू लागतो आणि तिला सोडून दुसरीकडे जातो. दरम्यान, काही खून होऊ लागतात, ज्याची उकल करण्याचे काम सीआय अजी कुरियन यांना मिळते आणि ते रहस्य उलगडते. या मालिकेचा क्लायमॅक्स खूपच अप्रतिम आहे.
उत्कृष्ट IMDb रेटिंगसह OTT वर ट्रेंडिंग
या मिनी वेब सिरीजचीला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळले आहे. या सीरिजला IMDb वर 10 पैकी 7.2 रेटिंग मिळाले आहे. जर तुम्हाला मर्डर मिस्ट्री आणि सस्पेन्स थ्रिलर चित्रपट किंवा हॉरर घटक असलेल्या सीरिजला पाहणे आवडत असेल तर ही सिरीज आवर्जून बघा. वीकेंडला तुम्ही हा चित्रपट आरामात घरी बसून पाहू शकता. ही एक मल्याळम मालिका असली तरी हॉटस्टारवर ती तुम्हाला हिंदीतही उपलब्ध आहे.