मुंबई : डाँ जब्बार पटेल यांचे नाव आगामी अखिल भारतीय नाट्यसंमेलन अध्यक्षपदासाठी एकमताने मंजुर झाले. नावाची घोषणा झाल्यानंतर १५ डिसेंबरच्या नियामक मंडळ बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर जाहीर होईल अशी माहिती काही दिवसांपूर्वी नाट्यपरिषद अध्यक्षांनी दिली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र मागील काही दिवसात संमेलन अध्यक्षपदाचे उमेदवार मोहन जोशी आणि डाँ जब्बार पटेल यांना मतदान करण्यासाठी समर्थकांचे फोनाफोनी संपर्क अभियान सुरु असल्याची चर्चा नाट्यक्षेत्रात वेगाने पसरतेय.  मतदानासाठी उमेदवार मोहन जोशी आणि डॉ. जब्बार पटेल समर्थकांचं संपर्क अभियान सुरु असल्याची सूत्रांनी माहिती
दिली आहे. 


अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे यंदा 100 वे वर्ष आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद  अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी ही घोषणा केली. नाट्यसंमेलनाच्या शतकमोहत्सवी वर्षात डॉ. जब्बार पटेल यांच्यासारख्या कसलेल्या अभिनेता, दिग्दर्शकाची निवड झाल्याने नाट्यवर्तुळातूनही समाधान व्यक्त केले जात होते. विशेष म्हणजे या वेळी नाट्यसंमेलन अध्यक्षपदासाठी प्रसिद्ध अभिनेते मोहन जोशी आणि जब्बार पटेल अशा दोघांचेच अर्ज आले होते.


अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कार्यकारी समितीत नाट्यसंमेलन अध्यक्षपदासाठी आलेल्या दोन्ही अर्जांवर सखोल चर्चा करण्यात आली. या चर्चेनंत कार्यकारी समिती सदस्यांनी डॉ. जब्बार पटेल यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब केले होते. मात्र आता निवडणूक होणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आगामी नाट्यसंमेलन अध्यक्षपदासाठी निवडणुकीचे नाट्य रंगणार अशी सूत्रांची माहिती आहे. 


डॉ. जब्बार पटेल हे जेष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आहेत. आजवर त्यांनी अनेक नाटक, चित्रपट यांचे दिग्दर्शन केले आहे. तर मोहन जोशींचा नुकताच 'सिनिअर सिटीझन' सिनेमा प्रदर्शित झाला आहे.