मुंबई : #Metoo मोहिमेला बॉलिवूडमधल्या ११ महिला दिग्ददर्शिकांचा पाठिंबा जाहीर केलाय. तसंच लैंगिक छळाचे आरोप सिद्ध झालेल्यांसोबत यापुढे काम न करण्याची भूमिका घेतली असली तरी याबाबत नेटकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. या यादीत फराह खान यांचं नाव का नाही आणि आरोप सिद्ध झाल्यानंतरच काम थांबवणार का, असे प्रश्न आता उपस्थित होतायत.


टीका सुरू


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमिर खान, अक्षय कुमार यांनी #MeTooबाबत कठोर भूमिका घेतल्यानंतर या ११ दिग्दर्शिकांनी निवेदन जारी केलंय. कोंकणा सेन शर्मा यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिलीये. मात्र त्यांनी घेतलेली ही भूमिका सावध असल्याची टीका सुरू झालीये.


शोषणाला वाचा फोडली 


#MeToo विषयी हिंदी आणि मराठी कलाविश्वातील अनेक अभिनेत्रींनी खुलेपणाने वक्तव्य केलं. फक्त अभिनेत्रीच नव्हे तर अभिनेते मंडळींनीसुद्धा मोहिमेत सहभागी होत महिला वर्गाला पाठिंबा दर्शवला.


मुख्य म्हणजे या मोहिमेअंतर्गत लैंगिक शोषणाच्या ज्या घटनांना वाचा फोडली गेली त्यातून अशा काही व्यक्तींची नावं समोर आली जी पाहता अनेकांच्याच भुवया उंचावल्या. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांच्या यादीतील असंच एक नाव म्हणजे 'संस्कारी बाबुजी' फेम अभिनेते आलोकनाथ यांचं.


आलोकनाथ यांच्यावर एका लेखिकेने बलात्काराचा आरोप केला होता.


ज्येष्ठ अभिनेता म्हणून ओळख असणाऱ्या आलोकनाथ यांच्याविषयी अनेकांनीच नाराजीचा सूरही आळवला.