मुंबई : अभिनेत्री सुष्मिता सेन बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. आज ती रूपेरी पडद्यावर दिसत नसली तरी सुष्मिताच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. झगमगत्या विश्वात आपलं स्थान प्रस्थापित करण्यासाठी फक्त सुष्मिताचं नाही तर अनेक अभिनेत्रींना अनेक गोष्टींचा सामना करवा लागला. एकदा गर्दीत15 वर्षांच्या मुलाने सुष्मितासोबत गैरवर्तन केलं. घडला प्रकार खुद्द सुष्मिताने एका मुलाखतीत सांगितला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुष्मिता म्हणाली, 'प्रत्येकाचा समज असतो की सेलिब्रिटींना बॉडीगार्ड असल्यामुळे त्यांना अशा गोष्टींचा सामना करावा लागत नाही. पण असं नसतं सार्वजनिक ठिकाणी 10 बॉडीगार्ड असतील तर 100 लोक तिकडे असतात. गर्दीन अभिनेत्रींसोबत छेडछाडीचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडतात.'



पुढे सुष्मिता म्हणाली, 'अवॉर्ड शे दरम्यान एका 15 वर्षाच्या मुलाने माझ्यासोबत गैरवर्तन केले. त्याला वाटले की गर्दी मोठी आहे आणि त्यामुळे मला काही कळणार नाही. पण मला सर्व कळालं मी त्याचा हात पकडला, पण तो फक्त 15 वर्षांचा आहे हे पाहून मला आश्चर्य वाटले. मी त्याला म्हणाले मी आता कारवाई केली तर तुझं संपूर्ण आयुष्य खराब होईल....'


'त्यानंतर तो म्हणाला मी काही केलं नाही. मी त्याच्याकडून घडला प्रकार कबूल करून घेतला आणि त्याला सांगितलं आता मी तुझा चेहरा पाहिला आहे. त्यामुळे पुढे असं काही करताना दिसला तर कारवाईल करेल....'