32 कोटींचं बजेट अन् 117 कोटींची कमाई, 17 वर्षे जुना `हा` चित्रपट बघताच प्रेक्षकांना अजूनही हसू आवरत नाही
चित्रपट प्रत्येकाला बघायला आवडतात. असाच एक कॉमेडी चित्रपट 17 वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. ज्याला पाहताच प्रेक्षकांना हसू आवरत नाही.
Bollywood Biggest Comedy Film: बॉलिवूडमध्ये अनेक कॉमेडी चित्रपट आहेत. ज्यांनी प्रेक्षकांचे प्रचंड मनोरंजन केलं आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, ज्याने 17 वर्षांपूर्वी प्रेक्षकांना खूप हसवले आणि आजही हा चित्रपट प्रेक्षकांना हसवत आहे. आजही हा चित्रपट प्रेक्षक तितक्याच आवडीने बघतात. काही प्रेक्षक तर हा चित्रपट पुन्हा पुन्हा बघत असतात. तुम्ही देखील हा चित्रपट अनेकदा पाहिला असेल, कोणता आहे तो चित्रपट जाणून घ्या सविस्तर
अक्षय कुमारचा 'वेलकम' चित्रपट
17 वर्षांपूर्वी म्हणजेच 2007 मध्ये अक्षय कुमारचा 'वेलकम' चित्रपट प्रदर्शित झाला होता. 2007 मधील सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट ठरला होता. एवढेच नाही तर आजही हा चित्रपट ओटीटीवर ट्रेंड करत आहे. लोकांना हा चित्रपट पाहायला अजूनही आवडतो. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली होती. अक्षय कुमारने अनेक कॉमेडी चित्रपटांमध्ये काम केले आणि आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. हा चित्रपटही त्यातलाच एक होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनीस बज्मी यांनी केले होते.
'वेलकम' चित्रपटात अक्षय कुमार आणि कतरिना कैफची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळाली. याशिवाय फिरोज खान, अनिल कपूर, नाना पाटेकर, कतरिना कैफ, परेश रावल आणि मल्लिका शेरावत यांसारखे कलाकार देखील या चित्रपटात दिसले होते. या चित्रपटाची कथा आणि चित्रपटातील गाणी देखील प्रचंड गाजली होती.
'वेलकम' चित्रपटाची कमाई
'वेलकम' चित्रपट 1999 मध्ये आलेल्या 'मिकी ब्लू आइज़' या कॉमेडी चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटाचे बजेट केवळ 32 कोटी रुपये होते आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 117.91 कोटी रुपयांची कमाई केली होती. हा चित्रपट 21 डिसेंबर 2007 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आणि जवळपास 25 आठवडे चित्रपटगृहांमध्ये चालला. हा चित्रपट त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला.
अक्षय कुमार आणि कतरिना कैफ यांच्या 'वेलकम' चित्रपटाला IMDb वर 10 पैकी 7.1 उत्कृष्ट रेटिंग मिळाले आहे. OTT प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट अनेकदा ट्रेंड करतो. यासोबतच हा चित्रपट प्राइम व्हिडिओ आणि यूट्यूबवर देखील खूप ट्रेंड करत आहे.