मुंबई : कॅन्सरने २४ तासात २ बॉलिवूड स्टार्स जग सोडून निघून गेले आहेत. बुधवारी इरफान खानच्या निधनानंतर बॉलिवूड विश्वाला मोठा धक्का बसला होता. त्यातून सावरत नाही की लगेचच दुसऱ्या दिवशी बॉलिवूडच्या आणखी एका दिग्गज अभिनेत्याच्या निधानाच्या बातमीने बॉलिवूडवर पुन्हा दु:खाचा डोंगर कोसळला. गुरुवार सकाळी अभिनेता ऋषि कपूर यांची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली आणि ते हे जग सोडून निघून गेले. बुधवारी प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांचे चाहते त्यांच्यासाठी प्रार्थना करत होते. पण सकाळी ही दु:खद बातमी आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

६७ वर्षीय ऋषि कपूर यांचं मुंबईच्या सर एचएन रिलायंस फाउंडेशन रुगणालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. २०१८ मध्ये ऋषी कपूर यांनी कॅन्सर असल्याचं निदान झालं. त्यानंतर ते एक वर्ष न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत होते. सप्टेंबर २०१९ ला ते भारतात परतले. अधून मधून त्यांना या नंतर रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात येत होतं. पण आज त्यांचं अखेर निधन झालं आहे.


भारतात आणि विश्वभरात या दोन्ही कलाकारांचे हजारो फॅन्स आहेत. इरफान खानने ते हॉलिवूडपर्यंत मजल मारली होती. ऋषी कपूर आणि इरफान खान या दिग्गजांच्या जाण्याने बॉलिवूड कलाकार स्तब्ध झाले आहेत. दोघेही कॅन्सरशी झुंज देत होते. दोघेही बरे होऊन भारतात आले पण अचानक दोघांची प्रकृती बिघडली आणि त्यांनी जगाला अलविदा केलं. सोशल मीडियावर आता बॉलिवूडसाठी हा काळा आठवडा असल्याचं आता म्हटलं जात आहे.


या २ अभिनेत्यांच्या जाण्याने अनेक सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला आहे. या २ नेत्यांच्या जाण्याने अनेक कलाकारांनी आपल्यासाठी धक्का असल्याचं म्हटलं आहे.