Mumbai Drugs Case : आर्यन-अनन्यानंतर आणखी दोन सेलिब्रिटी NCB च्या रडावर
बॉलिवूडमधील आणखी 2 मोठे सेलेब्स एनसीबीच्या रडारवर आहेत.
मुंबई : ड्रग रॅकेटचा नायनाट करण्यासाठी सतत कारवाई करूनच एनसीबीकडून आणखी मोठी कारवाई केली जाऊ शकते. सूत्रांच्या माहितीनुसार, बॉलिवूडमधील आणखी 2 मोठे सेलेब्स एनसीबीच्या रडारवर आहेत. NCB कधीही या सेलेब्सची चौकशी करु शकते. NCB ला या सेलेब्सची माहिती व्हॉट्सअॅप चॅटद्वारे मिळाली आहे.
हे सेलेब्स रेव्ह पार्टीमध्ये सहभागी झाले होते
बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरणामुळे बराच काळ झाला तुरुंगात आहे. 3 तारखेला त्याला रेव्ह पार्टीला उपस्थित राहिल्याबद्दल अटक करण्यात आली होती. एनसीबीने एका छाप्यादरम्यान आर्यनला या रेव्ह पार्टीतून ताब्यात घेतलं होतं. या रेव्ह पार्टीमध्ये सहभागी असलेल्या दोन मोठ्या सेलेब्सची माहिती एनसीबीला मिळाली आहे. व्हॉट्सअॅप चॅट तपासल्यानंतर एनसीबीला ही माहिती मिळाली.
अनन्या एनसीबी कार्यालयात पोहोचली
क्रूझ रेव्ह पार्टीमध्ये अडकलेल्या शाहरुखचा मुलगा आर्यनच्या जामिनाबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. आता या प्रकरणात अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरावर छापा टाकण्यात आला आहे. एनसीबीने बॉलिवूड अभिनेत्रीच्या घरावर छापा टाकला आहे. एनसीबीची कारवाई संपली आणि टीम परतली. अनन्या पांडेला एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी बोलावलं होतं. एनसीबीने चौकशीपूर्वी अनन्या पांडेच्या घरातून काही फोन, लॅपटॉप आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणं जप्त केली. एनसीबीला मिळालेल्या व्हॉट्सअॅप चॅटवरून आर्यन खान आणि अनन्या पांडे यांच्यात संभाषण झाल्याचं उघड झालं. एनसीबीचं झोनल डायरेक्टर समीर वानखेडे हे अनन्या पांडेची चौकशी करणार आहेत.
नवोदित अभिनेत्रीचे नाव
याशिवाय बॉलिवूडमध्ये नवीन एंट्री करणाऱ्या अभिनेत्रीच्या घरावरही एनसीबीने छापा टाकला आहे. व्हॉट्सअॅप चॅटमध्ये या अभिनेत्रीचं नाव समोर आल्याचं सांगितलं जात आहे. हे चॅट स्पेशल NDPS कोर्टमध्ये दाखल करण्यात आलं. याशिवाय एनसीबीची टीम शाहरुख खानच्या घरी मन्नतवर देखील पोहोचली. ही टिम काही डॉक्यूमेंटेशनमुळे पोहोचली.