COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


मुंबई : यंदा वर्षी अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या नव्या आयुष्याला सुरूवात केली आहे. अनेकांनी त्यांच्या नात्याला नाव दिलं आहे. अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशलने देखील डिसेंबरमध्ये लग्न केलं. त्यानंतर अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैनचं लग्न झालं आहे. यंदाच्या वर्षी विवाह बंधनात अडकलेल्या सेलिब्रिटींची यादी


अभिनेत्री कतरिना कैफ आणि आणि अभिनेता विकी कौशल 




कतरिना आणि विकी यांचा विवाह 9 डिसेंबर रोजी सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट बरवाडा येथे झाला. लग्नसोहळा आटोपल्यानंतर हे जोडपे मालदीवला रवाना झाले. आता लग्नानंतर दोघांना कामाला सुरूवात केली आहे. 


अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन 




अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैनच्या लग्नाचा सध्या सोशल मीडियावर चागंलाच बोलबाला आहे. त्यांच्या लग्नाचे अनेक व्हिडिओ सतत समोर येत आहेत. 14 डिसेंबर रोजी त्यांनी लग्न केलं.


अभिनेता नील भट्ट अभिनेत्री ऐश्वर्या शर्मा




 टीव्ही कलाकार नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्मा लग्न बंधनात अडकले आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
 
अभिनेता राहुल वैद्य अभिनेत्री दिशा परमार




राहुल आणि दिशा गेल्या काही वर्षांपासून खूप चांगले मित्र होते. पण बिग बॉसमध्ये राहुलने दिशाला प्रपोज केलं आणि दिशासुद्धा नकार देऊ शकली नाही. दोघींनी यंदाच्या वर्षी लग्न केलं. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहेत.