Bold We Series on OTT Platforms: OTT प्लॅटफॉर्मवर आपल्याला टीव्हीपेक्षा जास्त चांगला, दर्जेदार कंटेन्ट पाहायला मिळतो. याबाबत कदाचितच कुणाचं दुमत असेल. मात्र वेगवेगळ्या OTT प्लॅटफॉर्म्सवर बराच मोठा ऍडल्ट (Adult Content on OTT) कंटेन्ट उपलब्ध आहे. यापैकी अनेक अशा  वेब सिरीज (Bold Web Series) आहेत, ज्या तुम्ही तुमच्या घरच्यांसोबत बसून पाहू शकत नाही. या वेब सिरीजमध्ये एकतर अर्वाच्य शिव्या (Bad Words), प्रचंड मारहाण (Violance)  किंवा थेट शारीरिक संबंध (Physical Relations)  दाखले जातात. यामुळेच अशा वेब सिरीज घरच्यांसोबत बसून तुम्ही पाहून शकत नाहीत. जाणून घेऊयात याच अशाच काही ऍडल्ट वेब सिरीजबाबत. 


व्हर्जिन रिवर (Virgin River)  :


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हर्जिन रिव्हर ही एक प्रसिद्ध ऍडल्ट वेब सिरीज आहे. तुम्हाला जर रोमांस आणि सस्पेन्स ( romance and suspense ) यांचं कॉम्बिनेशन हवं असेल तर तुम्ही ही सिरीज पाहू शकाकतात. या सीरिजचे 3 भाग प्रेक्षकांसमोर आलेले आहेत. पहिल्या तीनही भागांमध्ये अनेक बोल्ड सीन्स आहेत. येणाऱ्या भागातही बोल्ड सीन्स (bold shots) असतील यात शंका नाही.  


हेही वाचा : 'तू खूप मस्त Kiss...', Vidya Balan नं दिली Pooja Bhatt ला शाबासकी 


आधा इश्क (Aadha Ishq) :


आधा इश्क या सीरिजमध्येही अनेक बोल्ड सीन्स आहेत. त्यामुळे तुम्ही जर ही सिरीज तुम्ही घरच्यांसोबत पाहायचा विचार करत असाल तर पुन्हा एकदा विचार करा. या सिरीजमध्ये लव्ह ट्रँगल आहे. या सिरीजमध्ये रोमान्स आणि सोबतच थ्रिल (Romance and thriller) देखील तुम्हाला पाहायला मिळेल. 


द समर आय टर्न्ड प्रिटी ( The summer I turned pretty) :


एक तरुणी, दोन भावंडं आणि त्यांच्यातील लव्ह ट्रँगल (love triangle) या लाईनवर ही वेब सिरीज पाहायला मिळेल. या सिरीजमध्ये बरेच बोल्ड सीन्स आहेत जे घरच्यांसमोर पाहताना तुम्हाला अवघडल्यासारखं वाटू शकतं. लेखिका जेनी हान (Jenny Haan) यांच्या एका पुस्तकावर आधारित ही एक बोल्ड वेब सिरीज आहे. 


हेही वाचा : Priyanka आणि Nick ची रोमॅण्टिक Moment... Video नं वेधलं सगळ्याचं लक्ष


मिर्झापूर 3 ( Mirzapur 3) :


प्रेक्षकांची प्रचंड पसंती मिळालेली वेब सिरीज म्हणजे मिर्झापूर. येत्या काळात मिर्झापूरचा पुढील भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पहिले दोन्ही भाग प्रेक्षकांना प्रचंड आवडले आहेत. अशात तिसऱ्या भागात बोल्ड, इंटिमेट सीन्सचा (Intimate Shots) भडीमार असल्याचं बोललं जातंय.   


OTT प्लँटफॉर्म्सवर तुम्हाला बोल्ड वेब सिरीजचा भडीमार पाहायला मिळतो. यामद्ये तुम्ही नेटफ्लिक्स (Netflix) किंवा ऍमेझॉन प्राईम (Amazon Prime)  सोडून MX प्लेयर (MX Player) किंवा उल्लू (Ullu) हे OTT प्लॅटफॉर्म्स वापरात असाल तर तुम्हाला अशा अनेक सिरीज मिळतील ज्या तुम्ही घरच्यांसोबत पाहू शकणार नाहीत. या सिरीज आजही एकट्यानेच पहिल्या जातात. या सीरिजमधील बोल्ड दृश्यांमुळे या सिरीज प्रचंड प्रसिद्ध आणि व्हायरल देखील होतात.