Priyanka आणि Nick ची रोमॅण्टिक Moment... Video नं वेधलं सगळ्याचं लक्ष

नुकतीच प्रियांका चोप्रा ग्लोबल सिटीझन फेस्टिव्हल (Hosting Global Citizen Festival) होस्ट करताना दिसली होती. 

Updated: Sep 25, 2022, 01:58 PM IST
Priyanka आणि Nick ची रोमॅण्टिक Moment... Video नं वेधलं सगळ्याचं लक्ष

Priyanka Chopra Viral Video: प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक जोनास (Nick Jonas) हे सर्वांचच आवडतं रॉमेण्टिक कपल आहे. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सगळीकडेच व्हायरल (Priyanka and Nick Viral Video) होत असतात. त्याचबरोबर त्यांच्या मुलीचा म्हणजे मालतीचा (Priyanka Chopra Daughter) फोटोही प्रियंका इन्टाग्रामवरून शेअर करत असते. मालतीच्या फोटोलाही चाहते पसंत करतात. विशेष म्हणजे प्रियंका आणि नीक कुठेही स्पॉट झाले की ते आपली रॉमेण्टिक मोमेंट सगळ्यांसोबत शेअर करत असतात. 

प्रियंकाची ओळख फक्त नीक जोनास पुरतीच नाही तर आज तिची ओळख बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्येही झाली आहे. आज प्रियांका चोप्रा ही ग्लोबल स्टार बनली आहे. अभिनयासोबतच प्रियांका तिच्या सामाजिक कार्यामुळेही चर्चेत असते. अलीकडेच प्रियांका युक्रेनमधील निर्वासितांना भेटण्यासाठी पोलंडला (Poland) गेलेली. 

आणखी वाचा - Juhi Chawla 'या' स्टार कीड्सच्या प्रेमात, वाचा कोण आहेत ते?

नुकतीच प्रियांका चोप्रा ग्लोबल सिटीझन फेस्टिव्हल (Hosting Global Citizen Festival) होस्ट करताना दिसली होती. जिथे तिचा पती निक जोनास 'जोनास ब्रदर्स'सोबत (Jonas Brothers) परफॉर्म करताना दिसला होता. हा सोहळा जरी अप्रतिम झाला असा तरी नीक आणि प्रियंकाची रॉमेण्टिक मोमेंट (Nick and Priyanka Romantic Moment) पाहून सगळ्यांचेच लक्ष त्यांच्याकडे वेधलं. 

आणखी वाचा - Amir Khan चा मराठी जावई आहे तरी कोण? photos होतायत व्हायरल

न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कमध्ये (New York Park Station) शनिवारी ग्लोबल सिटीझन फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आला होता. प्रियांका चोप्रा जोनास हा फेस्टिवल होस्ट करत होती. या शो दरम्यान एक व्हिडिओ समोर आला आहे जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये निक जोनास आणि प्रियंका चोप्रा सर्वांसमोर एकमेकांना किस (Priyanka and Nick Kiss) करताना दिसत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या व्हिडिओमध्ये जोनास ब्रदर्स (Jonas Brothers Perfomance) यांनी ग्लोबल सिटीझन फेस्टिव्हलच्या मंचावर गाणं म्हटलं आणि सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं. त्यानंतर शोच्या शेवटी प्रियंका नीकला स्टेजवर बोलवते आणि त्याला जवळ घेऊन कीस करते. 

व्हिडिओमध्ये प्रियांका चोप्रा रंगीबेरंगी ड्रेसमध्ये मोठ्या उत्साहात ग्लोबल सिटीझन फेस्टिव्हलचे एन्जॉय करताना दिसली. यावेळी प्रियंकानं समर लुक फोलो केला (Priyanka Chopra Summer Look) होता आणि तिनं ब्लॅक ग्लासेस घातले होते.