मुंबई : मल्यालम सिनेविश्वातील २८ वर्षीय सिने निर्माती नयना सूर्यनचा मृतदेह तिरुवनंतपुरम येथील  तिच्या राहत्या घरी आढळला. तिच्या मृत्यूचे खरे कारण अद्यापही समोर आलेले नाही. तिने अनेक दिग्दर्शकां सोबत सिनेमात सहायक म्हणून काम केले. रविवारी पोलिसांना तिच्या मृत देहाचा तपास लागला. शवविच्छेदनानंतर मृत्यू मागचे खरे गूढ समजेल असे पोलिसांनी सांगितले.


मधुमेहने ग्रस्त असलेली नयना तिच्या आजारावर उपचार घेत होती. पोलिसांनी सांगितले की, तिच्या आई अनेकवेळ फोन करूनही तिच्या कडून कोणत्याही प्रकारचे उत्तर मिळत नव्हते. आईला संशय आल्या नंतर नयनाच्या आईने तिच्या मित्रांना फोन केला आणि मित्रांना घडलेल्या घटनेची माहिती कळवली. त्यानंतर मित्र नयनाच्या राहत्या घरी पोहचले.मित्र नयनाच्या राहत्या घरी पोहचल्यानंतर ती बेडरूम मध्ये मृत अवस्थेत आढळली