मुंबई: अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या एका व्यक्तीवर प्रेम केल्यामुळे तीन केंद्रीय यंत्रणा रियाच्या पाठी हात धुऊन लागल्या आहेत. ही न्यायदेवतेची थट्टा आहे, अशी उद्विग्न प्रतिक्रिया रिया चक्रवर्तीचे वकील सतिश मानशिंदे यांनी व्यक्त केली. अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाने NCB मंगळवारी ड्रग्ज पेडलरशी संबंध असल्याप्रकरणी रिया चक्रवर्ती हिला अटक केली. गेल्या दोन दिवसांपासून NCBकडून रियाची कसून चौकशी सुरु होती. अखेर आज तिला ताब्यात घेण्यात आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुशांतची बहिण श्वेता म्हणतेय, 'खोटी FIR, रिया तू आम्हाला तोडू शकत नाही'



या सगळ्या घडामोडीनंतर रियाच्या वकिलांनी उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, ही न्यायदेवतेची क्रूर थट्टा आहे. एका अंमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या व्यक्तीवर प्रेम केल्यामुळे देशातील तीन केंद्रीय यंत्रणा एकट्या स्त्रीच्या पाठिशी लागल्या आहेत. सुशांत सिंह राजपूत हा अनेक वर्षांपासून मानसिक आजाराने ग्रस्त होता. ड्रग्ज आणि प्रतिबंधित औषधांचे सेवन केल्यामुळे त्याच्यावर आत्महत्येची वेळ आली, असे रियाच्या वकिलांनी म्हटले. 
दरम्यान, रिया चक्रवर्ती हिची आता वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. यासाठी रियाला सायन रुग्णालयात नेले जाण्याची शक्यता आहे. 



NCB ने यापूर्वी केलेल्या चौकशीदरम्यान रिया चक्रवर्ती हिने आपण गांजा असलेल्या सिगारेट ओढत असल्याची कबुली दिली होती. रियाच्या घरातून ताब्यात घेण्यात आलेल्या काही उपकरणांमुळे हा खुलासा झाला. एनसीबीने रियाच्या घरातून तिचा जुना मोबाईल फोन, लॅपटॉप, टॅब अशा गोष्टी ताब्यात घेतल्या आहेत. ज्यांच्या फॉरेन्सिक चाचणीत ही माहिती समोर आली.