मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतची (Sushant Singh Rajput) बहिण श्वेता सिंह किर्ती (Shweta Singh Kirti) आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर आपल्या भावाला न्याय मिळावा या हेतूने सतत पोस्ट टाकत आहे. तर दुसऱ्या बाजूला रिया चक्रवर्तीने (Rhea Chakraborty) सुशांतच्या याच बहिणीविरोधात तक्रार दाखल केली आहे. रियाच्या या कृतीला श्वेताने सडेतोड उत्तर दिलं आहे.
Nothing’s gonna break us, definitely not this fake FIR! #SSRFamilyStandsStrong #UnitedForSSRJustice #WholeIndiaIsSSRFamily https://t.co/iaJeKClSuO
— shweta singh kirti (@shwetasinghkirt) September 7, 2020
श्वेताने ट्विट करून म्हटलंय की, रिया अशा कृतीने आमचं कुटूंब तोडू शकत नाही. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलंय की, अशा पद्धतीने आमचं कुटूंब कुणीच तोडू शकत नाही. खोटी एफआयआरमध्ये कोणतीच ताकद नाही.
अभिनेत्री रिया चक्रवर्तीने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतकरता खोटी मेडिकल प्रिस्क्रिप्शन उपलब्ध करून देण्यात त्याचीच बहिण प्रियंका सिंह आणि इतरांविरोधात तक्रार दाखल केली आहे. रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी याची माहिती दिली.
वकील सतीश मानेशिंदे यांनी सांगितले,'रिया चक्रवर्तीने मुंबई पोलिसात प्रियंका सिंह, राम मनोहर लोहिया हॉस्पिटलचे डॉ. तरूण कुमार आणि इतर लोकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. २०२० च्या अंतर्गत सुशांतला ओपीडी रुग्णाप्रमाणे खोटी मेडिकल सर्टिफिकेट देण्याचा आरोप यामध्ये करण्यात आला आहे.'