मुंबई : बॉलिवूडमध्ये नाहीतर टीव्ही इंडस्ट्रीमध्येही स्वत:ची ओळख निर्माण करणारी अभिनेत्री मौनी रॉय कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.  मौनी रॉय कायमच सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. क्यूंकी सास भी कभी बहू थी या मालिकेतून मौनी रॉयने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. मात्र तिला खरी ओळख मिळाली ती नागिन मालिकेतूनच. मात्र तुम्हाला हे माहितीये का? की नागिन साइन करण्याआधी अभिनेत्रीची तब्येत इतकी बिघडली होती की, तिला दिवसातून चक्क 30 गोळ्या घ्याव्या लागायच्या. असा खुलासा स्वत: मौनी रॉयने एका मुलाखतीत केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकतीच मौनी रॉयने Mashable India ला एक मुलाखत दिली. यावेळी बोलताना अभिनेत्रीला तिच्या शारीरिक आरोग्याचा सगळ्यात कठीण टप्पा आठवला. यावेळी बोलताना मौनी रॉय म्हणाली, 'नागिन' सुरू होण्याआधी मी अशा टप्प्यात होती, जेव्हा असं वाटत होतं की माझं आयुष्य संपलं आहे... मी गंभीर आजारी आहे. मी नुकतंच झलक दिखला जा 9 पूर्ण केलं  आणि मला L-4-L-5 चा प्रॉब्लेम झाला होता. त्यामुळे मला सरळ उभं राहता येत नव्हतं. मी दिवसातून 30 गोळ्या घ्यायची. मला इंजेक्शनही देण्यात आली होती.


3 महिने  खिळली अंथरुणाला!
मौनी रॉय पुढे म्हणाली, जेव्हा तिला नागिन ऑफर करण्यात आली तेव्हा ती तीन महिने अंथरुणावर पडली होती. माझं वजन किती किलो वाढले आहे हे मलाही माहीत नाही... तो काळ खूप वाईट होता. मी तीन महिने अंथरुणाला खिळून होते


याच काळात मला नागिनसाठी फोन आला होता. कारण नागिनच्या आधी मी देवों का देव महादेवमध्ये काम केलं होतं आणि म्हणूनच मला दुसरी काल्पनिक कथा करायची नव्हती. जेव्हा मी प्रोडक्शन हाऊसमध्ये गेले होते तेव्हा मला ही गोष्ट सांगितली गेली होती. मी त्यांना  म्हणाले, मला एकता मॅडमला एकदा भेटायचं आहे. मला आठवतं मी जेव्हा एकता मॅडमला भेटले तेव्हा त्या या प्रोजेक्टबद्दल खूप उत्सुक होत्या. त्यांनी ज्याप्रकारे मला कथा सांगितली, मी ते करण्यास तयार झाले'' असं मौनी दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.