केबीसी 16 च्या सेटवर गोष्ट सांगितली 
बिग बींनी वटवाघुळं घरातून कशी बाहेर काढली, हे सांगितलं. शोच्या नव्या भागाची सुरुवात दार्जिलिंगच्या ग्रेसीलागिरीपासून झाली, जिने 20 हजार रुपयांच्या बोनससह 3 लाख 20 हजार रुपये जिंकले. तिच्यानंतर, सोनल गुप्ता फास्टेस्ट फिंगर फर्स्ट जिंकून हॉटसीटवर पोहोचली.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वटवाघुळाचा मनोरंजक किस्सा
या शोमधील काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यातील एका प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या घराशी संबंधित एक मजेशीर आणि धक्कादायक घटना शेअर केली आहे. त्यांनी सांगितलं की, एकदा त्यांच्या घरात म्हणजेचं 'जलसा' बंगल्यावर अचानक 40-50 वटवाघुळे घुसली, ज्यामुळे त्यांचं संपूर्ण कुटुंब घाबरलं होतं.  


अशा प्रकारे घरातील वटवाघुळे काढली
सोनलला पुढे हा किस्सा सांगत असताना अमिताभ यांनी त्यांना कोणी निलगिरीच्या तेलाचा वापर करण्याचा सल्ला दिल्याचं सांगितलं. अमिताभ म्हणाले, या वटवाघुळांमुळे सगळेचं खूप घाबरले होते, त्यावेळी त्यांना कोणी सल्ला दिला की संपूर्ण घरात निलगिरीचं तेल शिंपडा. जेणेकरून सगळे वटवाघुळं बाहेर येतील. अमिताभ यांनी तो सल्ला ऐकला आणि त्यांनी तेच केलं. काही वेळातच त्यांच्या घरातल्या व्हरांड्यातलं एका छिद्रातून सगळी वटवाघुळं ही बाहेर पडली. 


मजेत ते म्हणाले, 'आता हीच माझी नोकरी झाली आहे.'  अमिताभ बच्चन यांनी 2021-22 मध्ये एका ब्लॉगमध्ये या घटनेचा उल्लेखही केला होता. वटवाघळांपासून सुटका करण्यासाठी धूर, सॅनिटायझर लिक्विड, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आणि निलगिरी तेल यांसारखे अनेक उपाय करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले होते.


हे ही वाचा: https://zeenews.india.com/marathi/entertainment/pushpa-2-villain-fahad-faasil-romance-tripti-dhimri-in-imtiaz-ali-new-film/867311


अमिताभ बच्चन यांचा वर्कफ्रंट 
सध्या बिग बी 'कौन बनेगा करोडपती 16' च्या यजमानपदात आहेत. याआधी त्यांना प्रभास आणि दीपिका पदुकोणच्या 'कल्की 2898 AD' या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 600 कोटींचा गल्ला केला