मुंबई : कलाविश्वात प्रत्येक कलाकार फिटनेस फ्रिक असल्याचं दिसून येत आहे. कलाकार त्यांच्या पार्टनरसोबत वर्क आऊट करताना दिसतात. एवढंच नाही तर ते सोशल मीडियावर वर्क आऊटने फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात. शिवाय फिटनेस फ्रिक कपल चाहत्यांना कपल गोल्ससोबत फिटनेस गोल्स देत आसतात. बॉलिवूडमध्ये 5 कपल आहेत, जे कायम त्यांच्या पार्टनरसोबत वर्क आऊट करताना फोटो किंवा व्हिडीओ पोस्ट करत असतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर



सध्या कलाविश्वातील चर्चेत असणारी जोडी म्हणजे अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर. नुकताचं दोघे स्विमिंगपूलमध्ये वर्क आऊट करताना दिसले. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.


अभिनेत्री सुष्मिता सेन आणि मॉडेल रोहमन शॉल



अभिनेत्री सुष्मिता सेन आणि मॉडेल रोहमन शॉल सोशल मीडियावर वर्क आऊट करतना व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असतात. एवढंच नाही तर दोघे चाहत्यांना फिटनेट टिप्स देखील देत असतात. 


अभिनेत्री आशका गोराडिया आणि ब्रेंट गोबले



आशका गोराडिया आणि ब्रेंट गोबल एकमेकांसोबत पॉवर योगा करत असतात. त्याचे इंस्टाग्राम अकाउंटवर त्यांचे योगा करतानाचे अनेक फोटो आहेत.


अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली



अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली अत्यंत फिटनेस फ्रिक आहेत. दोघे एकमेकांच्या फिटनेसची काळजी घेत असतात. 


दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग



दीपिका आणि तिचा पती रणवीर वेगवेगळे ट्रेनिंग रूटीन फॉलो करतात. एवढंच नाही तर ते वर्क आऊट करताना देखील दिसतात. त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर वर्क आऊट करतानाचे अनेक फोटो आहेत.