Devara: जान्हवी कपूरच्या नावावर चाहत्यांची फसवणूक, 10 मिनिटांच्या सीनसाठी घेतले `इतके` कोटी
जान्हवी कपूरने जूनियर एनटीआरच्या `देवरा` चित्रपटामधून साउथ इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं आहे. या चित्रपटात ती जूनियर एनटीआरसोबत रोमान्स करताना दिसत आहे.
Janhvi Kapoor In Devara : 'देवरा' चित्रपटामध्ये जान्हवी कपूर आणि जूनियर एनटीआर यांचे 'धीरे धीरे' गाणे रिलीज झाल्यानंतर जान्हवीचे चाहते 'देवरा' चित्रपटामधील जान्हवीचा अभिनय पाहण्यासाठी खूप उत्सुक होते. 'देवरा' चित्रपटामधून जान्हवी कपूरने तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. मात्र, जान्हवी कपूरसाठी 'देवरा' चित्रपट पाहणाऱ्या चाहत्यांची फसवणूक झाली आहे.
'देवरा' चित्रपटाच्या पूर्वार्धात जान्हवीचा चेहराही दिसत नाही. एकूणच संपूर्ण चित्रपटात जान्हवीचा सीन फक्त 10 मिनिटांचा आहे. पण या 10 मिनिटांच्या सीनसाठी जान्हवी कपूरला 5 कोटी रुपये मिळाल्याची माहिती समोर येत आहे. अनेक बिग बजेट चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारणाऱ्या जान्हवी कपूरने 'देवरा' चित्रपटामध्ये 10 मिनिटांसाठी भूमिका का साकारली? असा प्रश्न सध्या चाहते सोशल मीडियावर विचार आहेत.
दरम्यान, 'देवरा' चित्रपटाची कथा दोन भागांमध्ये दाखविण्यात आली आहे. दुसऱ्या भागामध्ये जेव्हा 'देवरा' चित्रपटाची कहानी पुढे जाते. तेव्हा देवराचा मुलगा वारा (जूनियर एनटीआर) मोठा होतो. तेव्हा जान्हवी कपूरची झलक बघायला मिळते.
'देवरा' चित्रपटासाठी जान्हवीने घेतली मोठी रक्कम
जरी 'देवरा' चित्रपटात जान्हवी कपूर जास्त प्रमाणात दिसली नसली तरी 'देवरा' चित्रपटाच्या दुसऱ्या भागात ती जास्त वेळ बघायला मिळणार आहे. त्यामुळेच जान्हवी कपूरने हा चित्रपट करण्यास होकार दिला होता. 'देवरा' चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार असल्यामुळे मुख्य कलाकारांना दोन्ही चित्रपटांसाठी फी दिली जाते. त्यामुळेच जान्हवी कपूरला या चित्रपटासाठी 5 कोटी रुपये देण्यात आले आहेत. 'देवरा' 2 मध्ये जान्हवी कपूर पुन्हा तिच्या अभिनयाची जादू दाखवताना दिसणार आहे.
'देवरा' चा दुसरा भाग कधी येणार
एका मुलाखतीत कोराताला शिवा यांनी सांगितले की, सध्या त्यांनी 'देवरा' 2 चित्रपटासाठी फक्त 25 मिनिटे शूट केलं आहे. जर त्यांना कलाकारांच्या तारखा मिळाल्या तर तो येत्या 6 ते 7 महिन्यांमध्ये संपूर्ण चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करू शकतील. याचा अर्थ 'देवरा' 2 चित्रपटासाठी चाहत्यांना 1 ते दीड वर्षे वाट पाहावी लागणार आहे.