मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा आज वाढदिवस.  वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्यांचा दिग्गज दिग्दर्शक होण्यापर्यंतचा प्रवास...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वयाच्या २९ वर्षी त्यांनी परिंदे या सिनेमात साहाय्यक दिग्दर्शक म्हणून करिअरची सुरुवात केली. तेव्हापासून सुरू झालेला हा प्रवास सातत्याने चालू आहे. मात्र त्यांच्या करिअरमधील ५ सिनेमांमुळे त्यांना दिग्गज दिग्दर्शक होण्याचा मान मिळाला. पाहुया कोणते आहेत ते सिनेमे...


खामोशी


१९९६ मध्ये आलेली खामोशी हा सिनेमा संजय लीला भन्साळींचा दिग्दर्शक म्हणून दुसरा सिनेमा होता. यात सलमान खान-मनिषा कोईराला आणि नाना पाटेकर प्रमुख भुमिकेत होते. या सिनेमातील 'बाहों के दरमियां' हे गाणे चांगलेच गाजले. 


देवदास


२००२ मध्ये आलेल्या देवदास सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. यात शाहरुख खानच्या अभिनयाचे सर्वच स्तरातून कौतूक झाले. तर ऐश्वर्याने पारो व माधुरीने चंद्रमुखी ही व्यक्तिरेखा आपल्या अभिनयातून जिवंत केली. या सिनेमातील सर्वच गाणी फार गाजली.


ब्लॅक


२००५ मध्ये आलेला ब्लॅक सिनेमा संजय लीला भन्साळींच्या करिअरमधील माईल स्टोन ठरला. यातील रानी मुखर्जी आणि अमिताभ बच्चन यांची भूमिका लोकांच्या आजही लक्षात आहे. त्याचबरोबर या सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमा हा पुरस्कारही मिळाला.


बाजीराव-मस्तानी


दीपिका-रणवीर-प्रियंका या त्रिकूटाच्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली. लोकप्रिय ठरलेला हा सिनेमा २०१५ मध्ये प्रदर्शित झाला.


पद्मावत


वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित झालेला या सिनेमाला अनेक वादांनंतरही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यात दीपिका-रणवीर-शाहीद हे कलाकार प्रमुख भूमिकेत होते. यात रणवीरच्या अभिनयाचे खूप कौतूक झाले.