मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीसमोरील अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. रियाला ड्रग्स सेवन आणि अन्य आरोपांमुळे मंगळवारी अटक करण्यात आली. त्यानंतर तिने जामिनासाठी विशेष न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळला. एनसीबीने मला ड्रग्सचे सेवन करत असल्याची कबुली देण्यास दबाव टाकल्याचं वक्तव्य तिने न्यायालयासमोर केलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यानंतर 'झी न्यूज'ने रियाचा ड्रग्स सेवन करताना एक व्हिडिओ प्रसिद्ध केला. ज्यामध्ये ती ड्रग्सचं सेवेन करताना दिसून आली. शुक्रवारी एनसीबीने ड्रग्ससंदर्भात मोठा खुलासा केला. २५ बॉलिवूड सेलिब्रिटी ड्रग्स प्रकरणी एनसीबीच्या रडारवर असल्याचं सांगण्यात येत आहे. या सर्वांची नावं अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या चौकशीनंतर समोर आली आहेत. 


ड्रग्स सेवन प्रकरणातील ५ सेलिब्रिटींची नावं 'झी न्यूज'च्या हाती लागली आहेत. आता या सर्वांची चौकशी होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार रियाने चौकशी दरम्यान ज्या सेलिब्रिटींची नावं घेतली आहेत, त्यामध्ये अभिनेत्री सारा अली खानचं देखील नाव आहे.  


सारा अली खानने अगदी कमी वयात कलाविश्वात आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. ड्रग्स प्रकरणातील यादीमध्ये सारा पहिल्या क्रमांकावर आहे. तर दुसऱ्या नंबरवर अभिनेत्री रकुल प्रित सिंगचं नाव आहे. रियाने २० पानांच्या जबाबात रकुलचा उल्लेख केला. 


तिसऱ्या स्थानावर डिझायनर सिमोन खंभाटा आहे. तर चौथ्या स्थानावर सुशांतची मैत्रीण आणि रेनड्रॉप मीडियाची फाऊंडर रोहिणी अय्यर आहे. पाचव्या स्थानी 'दिल बेचारा' चित्रपटाचा दिग्दर्शक मुकेश छाब्रा आहे.