‘बालाकोट एअरस्ट्राइक’वर येणार वेब सीरिज; `रणनीति: बालाकोट एँड बियाँड`ची पहिली झलक पाहाच
Ranneeti Balakot and Beyond : `रणनीति: बालाकोट एँड बियाँड` वेब सीरिजचा पहिला लूक प्रेक्षकांच्या भेटीला...
Ranneeti Balakot and Beyond : ज्यादिवशी भारताने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला, ज्यामुळे आपल्या संरक्षण धोरणात बदल झाला आणि संरक्षण रणनीती बदलली. पुलवामा शहीदांना श्रद्धांजली अर्पण करताना त्या शूर सैनिकांच्या, वीर जवानांच्या बलिदानाचा सन्मान करण्यासाठी राष्ट्राने एकजूट दाखवली. हा दिवस पुलवामा हल्ला दहशतवादा विरुध्दच्या लढाईल आलेल्या आव्हानांची आठवण करुन देतो. आज 5 वर्षे उलटली पण प्रत्येक भारतीयांच्या जखमा, आठवणी अजूनही ताज्या आहेत. या महत्त्वाच्या प्रसंगामुळे देशाच्या धैर्याचा क्षण सर्वांनी पाहिला, 2024 मध्ये बालाकोट एअरस्ट्राइकच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्तानं, भारताच्या या ऐतिहासिक क्षणापासून प्रेरित होऊन JioCinema नं नुकतीच 'रणनीति: बालाकोट एँड बियाँड' या वेब सीरिजची झलक प्रदर्शित केली. पहिल्यांदाच, वेब सीरिजच्या माध्यमातून बालाकोट सारखं ऑपरेशन आणि ग्रुप कॅप्टन अभिनंदन वर्धमानला भारतात परत आणण्याचं मिशन, या पडद्यामागील घटना आता पडद्यावर दिसणार आहेत.
'रणनीति: बालाकोट एँड बियाँड' वेब सीरिजमध्ये बालाकोट ऑपरेशन, आतापर्यंत सामान्य जनतेला माहित नसलेल्या गोष्टी, घटना, रणनीति, आव्हानं या सगळ्याची छोटीशी झलक आणि नेमक कसं काय घडलं असेल याचं चित्र दाखवण्यात आलं आहे. संतोष सिंह दिग्दर्शित या वेबसिरीजमध्येआशुतोषराणा, आशिषविद्यार्थी, जिमीशेरगिल, लारादत्ता, प्रसन्नआदी दिग्गज आणि टॅलेंटेंड कलाकारांचासहभाग आहे.
वर्धापनदिना निमित्त अभिनेता जिमी शेरगिलनं त्याच्या भावना व्यक्त करताना म्हटले की, "5 वर्षांपूर्वी 15 फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे आपलं कर्तव्य आणि जबाबदारी पार पाडत आपल्या शूरवीर सैनिकांनी बलिदान दिले. आपण आपल्या जवानांनी दिलेलं बलिदान कधी विसरणार नाही, त्या प्रसंगानंतर सुध्दा आपला देश थांबला नाही, आपण सर्वांनी आपल्या देशाला पुन्हा लढताना पाहिले. बालाकोट एअरस्ट्राइक हा आपल्या देशाच्या आणि जवानांच्या साहसेचा कठोर संदेश होता. आपल्या भारताने खंबीरपणे भूमिका घेतली आणि ही तारीख कायमची प्रत्येक भारतीयांच्या मनात कोरली गेली. मी या वेब सिरीजचा एक भाग असल्याकारणामुळे मी माझ्या देशातील तो ऐतिहासिक, निर्णायक क्षण पुन्हा अनुभवला आणि जवानांबद्दल माझा आदर अजून वाढला आहे."
हेही वाचा : 'रेस्तराँमध्ये बदलले कपडे, बेंचवर झोपून...'; विवेक ओबेरॉयची का झालेली इतकी दयनीय अवस्था
“आर्मी पार्श्वभूमीतून आल्यामुळे, मी शौर्य, वीरता, त्याग, देशाबद्दलचे प्रेम हे सर्वकाही समजू शकते. 5 वर्षांपूर्वी पुलवामा येथे आपले जवान शहीद झाले, परंतु बालाकोट एअरस्ट्राइकमुळे आपला देशाबद्दलचा अभिमान अजून जास्त वाढला. या ऐतिहासिक क्षणाच्या वर्धापनदिना निमित्त, वेब सीरिजची झलक लाँच करण्यात आली आणि यामधून प्रत्येक सैनिकांचा आणि ज्यांनी ज्यांनी आपल्या देशाचे संरक्षण केले त्यांचा सन्मान करण्याचा उद्देश आहे, असं लारा दत्ता हिने म्हटले.