गांधी जयंतीच्या सुट्टीचा `देवरा` चित्रपटाला फायदा, कमाईत 50% वाढ, केली इतक्या कोटींची कमाई
`देवरा` चित्रटाने बुधवारी एकाच वेळी अनेक विक्रम मोडले आहेत. गांधी जयंतीच्या सुट्टीचा चित्रपटाला झाला जबरदस्त फायदा. जगभरात केली जबरदस्त कमाई.
Devara Box Office Collection Day 6: जूनियर एनटीआरच्या 'देवरा' चित्रपटाने सहाव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट देशातील 200 कोटी क्लबचा भाग बनला असतानाच या चित्रपटाने जगभरातील 300 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. चित्रपटाने बुधवारी गांधी जयंतीच्या सुट्टीचा जबरदस्त फायदा घेतला आहे. या चित्रपटाच्या कमाईमध्ये 50 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
'देवरा' हा चित्रपट कोरटाळा शिवाच्या दिग्दर्शनाखाली बनलेला अॅक्शन-ड्रामा चित्रपट आहे. जूनियर एनटीआर या चित्रपटात दुहेरी भूमिकेत आहे. तर अभिनेता सैफ अली खान, प्रकाश राज आणि जान्हवी कपूर त्याच्यासोबत आहेत. चित्रपटाचे बजेट 300 कोटी रुपये आहे. या चित्रपटाने सहाव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर चित्रपटाच्या बजेट पेक्षा जास्त कमाई केली आहे.
'देवरा' चित्रपटाने केली इतक्या कोटींची कमाई
रिपोर्टनुसार, जूनियर एनटीआरच्या 'देवरा' चित्रपटाने गांधी जयंतीच्या सुट्टीचा फायदा घेत जबरदस्त कमाई केली आहे. पाच भाषेतील या चित्रपटाने बुधवारी 21 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने मंगळवारी 14 कोटींची कमाई केली होती. गांधी जयंतीच्या सुट्टीचा फायदा घेत या चित्रपटाच्या कमाईत 50 टक्क्यांनी वाढ झाली. आतापर्यंत 'देवरा' चित्रपटाने देशभरात 208.35 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
हिंदी भाषेतील 'देवरा' चित्रपटाच्या कमाईत वाढ
तेलुगू भाषेतील 'देवरा' या चित्रपटाने सर्वाधिक कमाई केली आहे. सहा दिवसांमध्ये तेलुगू भाषेतील 'देवरा' चित्रपटाने 159.35 कोटींची कमाई केली आहे. हिंदी भाषेतील चित्रपटाची कमाई पहिल्या दिवसांपासून कमी प्रमाणात सुरु होती. मात्र, बुधवारी या भाषेतील चित्रपटाची कमाई 50 टक्क्यांनी वाढली आहे. सहाव्या दिवशी हिंदी भाषेत चित्रपटाची कमाई 6.50 कोटी रुपये आहे. आतापर्यंत हिंदी भाषेतील चित्रपटाने 41.75 कोटींची कमाई केली आहे.
'देवरा'ची जगभारत किती कमाई?
बुधवारी 'देवरा' या चित्रपटाने जगभरातील कलेक्शनमध्ये मोठे स्थान पटकावले आहे. सहाव्या दिवशी या चित्रपटाने जगभरात बॉक्स ऑफिसवर 314 कोटींची कमाई केली आहे. यापैकी परदेशात 67.50 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने सर्वात जास्त कमाई करणाऱ्या टॉप 10 चित्रपटांच्या यादीत स्थान मिळवले आहे.