लग्नबंधनात अडकला 53 वर्षीय दिग्दर्शक; 18 वर्षाने लहान अभिनेत्रीशी बाधंली लग्नगाठ
चित्रपट निर्माते जेम्स गन आणि जेनिफर हॉलंड यांनी लग्नगाठ बांधली आहे.
मुंबई : चित्रपट निर्माते जेम्स गन आणि जेनिफर हॉलंड यांनी लग्नगाठ बांधली आहे. दोघांनी एका खाजगी समारंभात लग्न केलं. सात वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्नगाठ बांधली. आम्ही तुम्हाला सांगतो की जेनिफर जेम्सपेक्षा खूपच लहान आहे. जेम्स 53 वर्षांचा आहे, तर जेनिफर केवळ 35 वर्षांची आहे.
जेम्सने त्याच्या इन्स्टाग्रामवर लग्नातील सुंदर फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये असं पाहिलं जाऊ शकतं की, लग्न समारंभात जेम्सने हिरव्या रंगाचा सूट घातला होता आणि तो खूपच देखणा दिसत होता. तर तिथे जेनिफर हॉलंडने पांढरा गाऊन परिधान केला होता. ज्यामध्ये जेनिफर खूपच सुंदर दिसत होती. जेम्सने शेअर केलेल्या फोटोंमध्ये जेम्स आणि जेनिफर दोघंही एकमेकांना किस करताना दिसत आहेत. दोघंही खूप छान दिसत आहेत.
यासोबत जेम्सने त्याच्या लग्नाच्या केकचा फोटोही शेअर केला आहे. जेम्सने लग्नाचे फोटो शेअर करत लिहिलं की, "सात वर्षे एकत्र राहिल्यानंतर, अखेर मी माझ्या आयुष्यातील प्रेम जेनिफर हॉलंडशी लग्न केलं. कुटुंब आणि मित्रांसोबत किती सुंदर दिवस होता."
सात वर्षे डेटिंग केल्यानंतर लग्नगाठ बांधली
जेम्स आणि जेनिफरच्या लग्न समारंभात डीसी आणि मार्वल सॉफ्टबॉल गेम देखील होता. जे दोन्ही बाजून आले होते. कारण जेम्स हा निर्माता आहे. ज्याने दोन्ही फ्रँचायझींमध्ये काम केलं आहे.जेम्सने गार्डियन्स ऑफ द गॅलेक्सी आणि द सुसाइड स्क्वाड या दोन्हींचं दिग्दर्शन केलं आहे. विशेष म्हणजे जेम्स आणि जेनिफर सात वर्षांहून अधिक काळ एकमेकांना डेट करत होते. त्याच वर्षी दोघांनीही एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. दोघांनी फेब्रुवारीमध्ये एंगेजमेंटची घोषणा केली होती.