मुंबई : हिंदी सिनेसृष्टीत अभिनेत्री कंगना , अभिनेता मनोज वाजपेयी आणि धनुषला राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. अभिनेत्री कंगनाला मणिकर्णिका आणि पंगा या सिनेमातल्या अभिनयासाठी कंगनाला यावर्षीचा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. यावेळी कंगना आपल्या आई-वडिलांसह पुरस्कार सोहळ्यात हजर होती,.तर मनोज वाजपेयीला 'भोंसले' या हिंदी सिनेमा साठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं. मनोज वाजपेयीसह अभिनेता धनुषलाही सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळात तर छिछोरे सिनेमाला सर्वोत्कृष्ट हिंदी फिल्म म्हणून गौरवण्यात आलं. 



सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - कंगना राणावत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री कंगना राणौतला पुन्हा एकदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.  25 जानेवारी 2019 रोजी प्रदर्शित झालेल्या 'मणिकर्णिका' आणि 24 जानेवारी 2020 रोजी 'पंगा' या चित्रपटासाठी सन्मानित करण्यात आले.



सर्वोत्कृष्ठ अभिनेत्री - मनोज बाजपेयी


मनोज बाजपेयी यांना भोंसलेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. देवाशीष मखीजा लिखित आणि दिग्दर्शित नाट्य चित्रपटातील मनोज बाजपेयीच्या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.


सर्वोत्कृष्ट चरित्रात्मक चित्रपट - एलिफंट डो रिमेम्बर


स्वाती पांडे दिग्दर्शित 'एलिफंट दो रिमेम्बर' ला सर्वोत्कृष्ट चरित्रात्मक चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे.



सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - विजय सेतुपती


दक्षिणेतील अभिनेता विजय सेतुपतीला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. 29 मार्च 2019 रोजी प्रदर्शित झालेल्या 'सुपर डिलक्स' या तमिळ चित्रपटासाठी त्यांना पुरस्कार देण्यात आला. त्यागराजन कुमार राजा यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.


सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - पल्लवी जोशी


दक्षिण अभिनेत्री पल्लवी जोशीला 'द ताश्कंद फाइल्स'मधील भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित हा चित्रपट १२ एप्रिल २०१९ रोजी प्रदर्शित झाला. 4 कोटींचे बजेट असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 20 कोटींपेक्षा जास्त कलेक्शन केले होते.