पोपट पिटेकर, झी मीडिया, मुंबई  : अहमदनगर जिल्ह्यातील "कुंकुमार्चन" या लघुपटाला (Kumkumarchan) 'नॉन फीचर फिल्म'  या श्रेणीत सर्वोत्कृष्ट कौटुंबिक मूल्यांवर आधारित सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं पारितोषिक  (68th National Film Awards) देण्यात आलं. या चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजीत दळवी, निर्माते पुष्कर तांबोळी, प्रणित मेढे यांना रजत कमळ (National Silver Lotus Award) आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं. (68th National Film Awards) 68 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा नवी दिल्लीतील विज्ञान भवनात पार पडला.  (68th national film awards short film kumkumarchan given award in non feature film category)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रपट महोत्सव संचालनालयाने भारतीय चित्रपटसृष्टीतील 2020 मधील सर्वोत्कृष्ट चित्रपटांना सन्मानित करण्यासाठी वार्षिक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान केला. पुरस्कार सोहळा 3 मे 2021 रोजी पार पडणार होता. मात्र तेव्हा देशात कोरोनाचं सावट होतं. त्यामुळे हा सोहळा पुढे ढकलण्यात आला. यानंतर 22 जुलै 2022 रोजी विजेत्यांची नावं जाहीर करण्यात आली. त्यानंतर अखेर आज (30 सप्टेंबर 2022)  हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.


कुंकुमार्चन हे उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या अनुष्का मोशन पिकचर्सची प्रस्तुती आहे. या लघुपटाचे दिग्दर्शक अभिजित दळवी यांनी केलंय. या लघुपटात बंडू झिंजुरके, विद्या जोशी यांची भूमिका आहे. एका दिव्यांग मुलाची आणि त्यांच्या आईची गोष्ट या लघुपटात दाखवण्यात आली आहे. संपूर्ण चित्रीकरण हे अहमदनगर शहर आणि नगरजवळील जेऊर बायजाबाई आणि डोंगरगण येथे झालेली आहे. या लघुपटाची मूळ कथा कौस्तुभ केळकर यांची आहे. आदित्य बेडेकर यांनी या लघुपटाला संगीत दिलंय. सारंग देशपांडे यांनी साउंड केलंय. या लघुपटाची संपूर्ण टीम नगरमधील आहे. कुंकुमार्चनला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने नगरमध्ये सर्व स्तरांतून कलाकार आणि कुंकुमार्चन टीमवर कौतुकांचा वर्षाव होत आहे.